अन्नसुरक्षा आणि मानके कायदा : अॅड. पी.एम.कुलकर्णी [ मे २०२३ ]
- Vyapari Mitra
- Apr 27, 2023
- 1 min read
Updated: May 23, 2023

अॅड. पी. एम. कुलकर्णी,
96891 34002
fssaiadvpmk@gmail.com
अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 दिनांक 5.8.2011 पासून अंमलबजावणीत आला, तथापि कायदा पूर्णतया नवीन असल्याने त्यातील परिपूर्ततेत सवलती मिळत होत्या. त्यानंतर कायदा, नियम, व विनियमनात खूपच नवीन सुधारणा वारंवार होत असल्याने अन्न व्यावसायिक चालकास त्याबाबत कल्पना नसल्याने अनेक अडचणीला सामोरे जावे लागते.
आता नवीन सुधारणानुसार प्रत्येक अन्न उत्पादक, रिपॅकर, रिलेबलर यांना दर सहामाही त्यांची अन्न उत्पादने यांची जिवाणू विषाणू NABL/FSSAI मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून विश्लेषण करून तसेच उत्पादकांची स्वत:ची प्रयोगशाळा असल्यास सर्व अन्न उत्पादनासह त्यातील विश्लेषण करावयास लागणार्या केमिकलचेही विश्लेषण करून अहवाल FosCos वर परवाना प्राधिकारी यांना नियत कालावधीत अपलोड करणे बंधनकारक आहे. FosCos वर अपलोड करण्याचा कालावधी :
1 एप्रिल ते 30 सप्टेंबर : 31 ऑक्टोबर पर्यंत
1 ऑक्टोबर ते 31 मार्च : 30 एप्रिल पर्यंत
त्याचप्रमाणे सर्व अन्न उत्पादक. रिलेबलर, रिपॅकर यांना त्यांनी उत्पादित केलेल्या अन्नपदार्थांचा फॉर्म डी-1 नुसार तपशीलवार वार्षिक परतावा (Return) FosCos वर दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीच्या प्रत्येक वर्षी 31 मे पूर्वी अपलोड करणे बंधनकारक आहे. तसे सादर न केल्यास 1 जूनपासून सादर करेपर्यंत प्रत्येक दिवशी 100 दंड आकारणी केली जाईल.
सदर विश्लेषण अहवाल किंवा वार्षिक परतावा. फॉर्म डी-1 मेलद्वारे वा टपालद्वारे वा समक्ष स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे नियोजित कालावधी पूर्वी तो Foscos वर अपलोड करण्याशिवाय अन्न व्यवसाय चालकास पर्याय नाही. त्यामुळे अन्न व्यवसाय चालकांनी वेळेतच योग्य ती दक्षता व खबरदारी व मार्गदर्शन घ्यावे. FosCos.fssao.gov.in