top of page

अन्नसुरक्षा आणि मानकेकायद्यातील प्रमुख सुधारित नियम, विनियमने:अ‍ॅड. पी. एम. कुलकर्णी [ एप्रिल २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Apr 8, 2023
  • 2 min read

Updated: Apr 14, 2023




ree
अ‍ॅड. पी.एम.कुलकर्णी,
अन्न सुरक्षा आणि मानके कायदा सल्लागार,
मोबाईल नं. 9689134002 व 9421733002
fssaiadvpmk@gmail.com



अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यामध्ये कलम, नियम, विनियमन यात वारंवार सुधारणा होत असून अन्न व्यावसायिकांना त्याची कल्पना नसते; त्यामुळे कायदेशीर कार्यवाही व दंड (भुर्दंड) यास सामोरे जावे लागते, याशिवाय सुधारणा राजपत्र, उपदेशिका याद्वारेही सुधारणा होत असतात, तरी प्रमुख सुधारणा व बदल अन्न व्यावसायिक चालकास कळावेत म्हणून नोंद घेण्यास्तव सध्याचे काही बदल खालीलप्रमाणे.:

  1. यापुढे अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याप्रमाणे मिळणारा परवाना फक्त एक वर्षासाठीच नूतनीकरण केला जाईल. म्हणजेच दरवर्षी परवाना विहित कालावधीत नूतनीकरण करून घ्यावा लागेल.

  2. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याखाली 12 लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या छोट्या अन्न व्यावसायिकास मात्र नोंदणी कालावधी कमाल 5 (पाच) वर्षाचा ठेवण्यात आलेला आहे.

  3. अन्न परवाना त्याची मुदत संपण्याचे आधी 180 दिवस नूतनीकरण करून घेता येईल.

  4. अन्न उत्पादक, रिलेबलर्स. रिपॅकर्स तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक डेअरी यांना वर्षातून एकदा 31 मेपर्यंत डी-1 रिटर्न (परतावा) ऑनलाईन ऋेीलेी वर अपलोड करावा लागेल, 1 जूनच्यानंतर दर दिवशी 100 दंडाची आकारणी रिटर्न भरेपर्यंत होईल. यापूर्वी ही आकारणी जोपर्यंत रिटर्न भरले जात नाही तोपर्यंत केली जात होती, तथापि त्यात सुधारणा करण्यात आलेली असून 2022-23 च्या पुढील रिटर्नसाठी अन्न परवान्याची एक वर्षाच्या फीच्या पाचपटी पेक्षा जादा आकारणी करता येणार नाही.

  5. अन्न उत्पादक, रिलेबलर्स. रिपॅकर्स तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक डेअरी याना वर्षातून दोनवेळा (सहामाही) अन्न पदार्थ जीवाणू, विषाणू परीक्षण करून त्याचा होम प्रयोगशाळा (त्यातील वापरण्यात येणारी रसायने) वा NABL/FSSAI मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचा अहवाल ओनलाईन Foscos वर अपलोड करावा लागेल.

1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेबर 2022 या कालावधीचे रिटर्न 31 मार्च 2023 पर्यंत सादर करावे लागतील, यापुढे कालावधी संपल्यावर रिटर्न सादर करण्यास एक महिन्याची मुदत राहील. म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबरचे रिटर्न 31 ऑक्टोबरपर्यंत तर ऑक्टोबर ते मार्च या कालावधीतील रिटर्न 30 एप्रिल पर्यंत सादर करता येतील.

रिटर्न सादर करण्याचे कालावधीत नवीन परवाना घेणार्‍या अन्न व्यावसायिकास त्या कालावधीसाठी रिटर्न भरण्यापासून सवलत मिळेल.

 
 
bottom of page