top of page

आयकर - ज्येष्ठ व अति ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे लाभ [ जुलै २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Jul 28, 2023
  • 2 min read

आयकर - ज्येष्ठ व अति ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे लाभ

ree









(1) ज्येष्ठ व अतिज्येष्ठ नागरिक कोण?

60 वर्षे किंवा त्याहूनजास्त वय असलेल्या सर्व निवासी भारतीयांना ज्येष्ठ नागरिक म्हटले जाते आणि 80 वर्षे किंवा त्याहून जास्त वय असणार्‍या निवासी भारतीय नागरिकांना अतिज्येष्ठ नागरिक म्हटले जाते.


(2) ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ (करदात्यांना) उच्च करमाफी मर्यादा

आयकर कायद्यात सर्वसामान्य करदात्यांना सध्या रु.2.50 लाख एवढी करमाफीची मर्यादा आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 3 लाख आहे आणि ज्या अतिज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न रु.5 लाखापर्यंत आहे. त्यांनाआयकर भरावा लागत नाही किंवा पत्रकही दाखल करणे बंधनकारक नाही.


(3) आगाऊ आयकर भरण्यापासून मुक्तता

ज्या करदात्यांची वार्षिक अंदाजित करदेयता रु.10,000 किंवा त्याहूनजास्त असते त्यांना अग्रिम कर भरणा करणे बंधनकारक आहे. परंतु ज्येष्ठ नागरिक करदात्यांना अग्रिम कर भरणा बंधनकारक नाही. मात्र त्यांचे अर्जित उत्पन्न “धंदा किंवा व्यवसाय यातील नफा’’ या शीर्षकांतर्गत नसावे.


(4) प्रमाणित वजावटीचा लाभ

आकारणी वर्ष 2020-21 पासून पगारापासून उत्पन्न असलेल्या करदात्यांना रु.50,000 एवढी प्रमाणित वजावट मिळते. पगार उत्पन्नावर रु.50,000 प्रमाणित वजावट ज्येष्ठ नागरिक आणि अतिज्येष्ठ नागरिक क्लेम करू शकतात.


(5) आकारणी वर्ष 2023-24 आयकराचे दर

संबंधितांना नवी करप्रणाली कलम 115 किंवा यापूर्वी प्रचलित करप्रणाली निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

ree

(6) व्यक्तिगत करदात्यांसाठी (आकारणी वर्ष 2021-22 पासून) नवी करप्रणाली
ree

(7) आरोग्य विमा प्रीमियमची उच्च वजावट - कलम 80डी

कलम 80डी अंतर्गत आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर संमत केलेली वजावटीची उच्चतम मर्यादा रु.50 हजार ही मर्यादाइतर सर्वसामान्य (ज्येष्ठ नागरिक नसलेल्यांसाठी) रु.25 हजार आहे. ज्येष्ठनागरिकांच्या आरोग्यावर केलेल्या खर्चाबाबतची वजावट सुद्धा रु.50 हजारची संमत होते. मात्र या केसमध्ये आरोग्य विम्याच्या प्रीमियमचे पेमेंट झालेले नसावे. तसेच अशा आरोग्य विम्याच्या प्रीमियमचे पैसे रोखीने दिलेले नसावे.


(8) विनिर्दिष्ट रोग इलाज/उपचारावरील खर्च वजावटीबाबतची कमाल मर्यादा - कलम 80डीडीबी

सर्वसामान्य करदात्यासाठी अशी कमाल मर्यादा 80डीडीबी अंतर्गत रु.40 हजार आहे. मात्र अशा करदात्यावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या उपचाराबाबतची ही मर्यादा 2019-2020 पासून

1 लाख करण्यातआलेली आहे.


(9) बँक व पोस्ट ऑफिसमधील ठेवींवर अर्जित व्याजाच्या वजावटीची मर्यादा -कलम 80टीटीए

बिगर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 80टीटीए अंतर्गत रु.10 हजार आहे. मात्र 2019-20 पासून ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत खाते व ठेवींवरील व्याजाच्या वजावटीची उच्चतम मर्यादा 80टीटीए अंतर्गत रु.50 करण्यात आलेली आहे. तसेच असे व्याज रु.50 हजारपेक्षा कमी असेल तर बँक किंवा पोस्ट ऑफिस त्यावर करकपात (टीडीएस) करणार नाही.


(10) कागदी स्वरूपात पत्रक दाखल करावयाची पात्रता

अतिज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 80 वर्षे किंवा जास्त असेल तर ‘सहज’ (आयटीआर-9) किंवा ‘सुगम’ (आयपीआर4) मध्ये पत्रक दाखल करू शकतात. मात्र अशा करदात्यांचे वार्षिक उत्पन्न रु.5 लाख किंवा जास्त असेल व त्यांनापरतावा देय असेल तर ते कागदी स्वरूपात पत्रक दाखल करू शकतात. अशा करदात्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पत्रक दाखल करण्याचे बंधन नाही.


(11) टीडीएस होऊ नये यासाठी फॉर्म 15एच दाखल करता येतो

या कलमात विहित केलेल्या उत्पन्नाबाबत ज्येष्ठ नागरिकांना 15एच करकपात करणार्‍यांकडे दाखल करता येतो. जेणेकरून बँकेचे व्याज, शेअर्सवरील डिव्हिडंड वगैरेमधून टीडीएस केली जाणार नाही. अर्थात संबंधित आकारणी वर्षातील त्यांची करदेयता शून्य असावी लागते. हा फॉर्म दरवर्षी दाखल करावा लागतो. संबंधितांनी एप्रिल महिन्यातच सदर फॉर्म संबंधित संस्थांना द्यावा.


(12) भांडवली संपत्तीहस्तांतरण अंतर्गत रिव्हर्स मॉर्गेज योजनेवरील आयकर तरतुदी

ज्येष्ठ नागरिकांनी निवासी घरावर रिव्हर्स मॉर्गेज ॠण घेतले असेल तर अशा भांडवली संपत्ती हस्तांतरण व्यवहारावर (सरकारने अधिसूचित केलेली योजना) कोणताही आयकर भांडवली नफा म्हणून (किंवा अन्य शीर्षकांतर्गत) लागू होत नाही.


 
 
bottom of page