top of page

आयकर पत्रक का भरावे [ जून २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Jun 2, 2023
  • 1 min read

ree

१) बँक कर्ज मिळवण्यासाठी गरजेचे :


आपणास कर्ज बँक किंवा कर्ज खासगी संस्थेकडून घ्यावयाचे असल्यास सर्वप्रथम कागदपत्रांमध्ये कमीतकमी ३ वर्षाचे विवरणपत्रक मागितले जाते. आयकरपत्रकावरून आपले उत्पन्न, आपल्याकडील कर्ज, ॲडव्हान्स, उधारी येणे-देणे इ. माहिती बँकेला समजते. तसेच आपली कर्जफेडीची पात्रता ही समजू शकते. आपण नियमितपणे आयकर पत्रक दाखल करत असाल तर आपणास बँकेकडून कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. आपला त्रास कमी होतो.


२) आयकर परतावा मिळण्यासाठी :

आपल्या ठेवीवर बँकेकडून अथवा ज्यांना कर्जाने रक्कम दिली आहे त्यांच्याकडून टीडीएस केला गेला असल्यास, पगारातून करकपात झालेली असल्यास आणि आपल्याला भरावा लागणाऱ्या आयकरपेक्षा वरीलप्रमाणे टीडीएस केलेली रक्कम जास्त असल्यास सदर ज्यादा भरलेली रक्कम रिफंड घेण्यासाठी आपणास आयकरपत्रक दाखल करणे गरजेचे आहे. आपण आयकरपत्रक दाखल केले की, त्यानुसार आयकर खात्याकडून छाननी होते व आपण जास्त भरलेला आयकर आपल्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो.


३) व्हिसासाठी आवश्यक :

आपणास परदेशामध्ये जायचे असल्यास आपणास व्हिसा काढावा लागतो. अनेक देशाचे व्हिसा अधिकारी आयकरपत्रकाची मागणी करतात. ज्या व्यक्तीला व्हिसा हवा आहे त्यांची आर्थिक स्थिती काय आहे हे आयकरपत्रकावरून तपासले जाते, त्यांची छाननी करूनच ते त्या व्यक्तीला व्हिसा देतात वा नाकारू शकतात.


४) विमा कंपन्यांकडून मागणी :

आपणास टर्म इन्शुरन्स विमा संरक्षण प्लॅन घ्यावयाचा असेल तर विमा कंपन्या आपणास आयकरपत्रकाची मागणी करू शकतात. आयकरपत्रकातील उत्पन्नानुसार विमा कंपन्या आपणास किती रकमेचा टर्म इन्शुरन्स देता येईल याचा अंदाज लावतात. आपल्या उत्पन्नानुसार टर्म इन्शुरन्स पात्रता विमा कंपन्या ठरवतात. आपल्या आयकर पत्रकावरून आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत त्यांना जाणून घेता येते.

 
 
bottom of page