top of page

आर्थिक घडामोडींचा वेध [ एप्रिल २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Apr 8, 2023
  • 3 min read

Updated: Apr 14, 2023


ree
सिल्वोस्टाईल बाय पीएनजी चे नवीन दालन

पीएनजी ज्वेलर्स तर्फे सिल्वोस्टाईल बाय पीएनजी या संकल्पनेचे पहिले दालन औंध येथे सुरु करण्यात आले आहे. या दालनात चांदीच्या आकर्षक दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही माहिती श्री. सौरभ गाडगीळ यांनी दिली. ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे भारतातील प्रमुख शहरात 2023-24 या वर्षात अशी 15 दालने सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. या दालनात नेकलेस, ब्रेसलेट पासून अंगठ्या, कानातले दागिने तरुण पिढीला आकर्षित करतील.


बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ

देशातून होणार्‍या बासमती तांदळाच्या निर्यातीत 41 टक्के तर बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत 3.1 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत ही वाढ झाली आहे. महाराष्ट्रातून इंद्रायणी, आंबेमोहोर तांदूळ अमेरिका, ब्रिटनला जातो. कर्नाटकातून सोना मसुरी, आंध्रमधून डॅश, मसुरीची निर्यात होते. शेला तांदूळ सौदीमध्ये तर भारतीय तुकडा तांदूळ बांग्लादेशात निर्यात होतो. असे तांदुळाचे निर्यातदार श्री. राजेश शहा यांनी सांगितले.


राज्यात मोबाईल धारकांची संख्या घटली

महाराष्ट्रात 2022 अखेर पर्यंत 12 कोटी 15 लाख मोबाइलधारक असून गेल्या वर्षीच्या तुलनेत या संख्यात दहा लाखांची घट झाली आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल च्या ग्राहकांची संख्या वाढली असली तरी ‘एमटीएनएल’, ‘बीएसएनएल’ व वोडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. कोरोनाचा व वाढत्या दराचा फटका ही घटी मागची प्रमुख करणे आहेत.


राज्यातील वाहनांची संख्या 24 लाखांनी वाढली

राज्यातील वाहनांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 लाखांची वाढ झाली आहे. यामध्ये विद्युत वाहनांची संख्या 1 लाख 93 हजारांनी वाढली आहे. राज्यात सध्या 66 लाख 32 ह्जार मोटारी तर तीन कोटी 15 लाख दुचाक्या आहेत. कोरोना नंतर रुग्णवाहिकांच्या संख्येत साडेअकरा हजारांनी वाढ होऊन ती एक लाख सहा हजार झाली आहे.


दोन कोटी सहकारी संस्था

राज्यात दोन कोटी 23 लाख सहकारी संस्था असून त्यातील सभासदांची संख्या 5 कोटी 90 लाख आहे. यापैकी 9.5 टक्के प्राथमिक कृषी पुरवठा संस्था, 13.9 बिगर कृषी पतपुरवठा संस्था तर 54 टक्के गृहनिर्माण संस्था आहेत.


देहात च्या वतीने मेळावा
ree

‘देहात’ या कंपनीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे कृषी उत्पादन संबंधीचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांना बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ‘देहात’ चे केंद्र संचालक श्री. संदीप वाघ, देहातचे सहसंस्थापक श्री. अमरेंद्रसिंग, सिद्धार्थ चौधरी, प्रगतिशील शेतकरी श्री. संजय वाघ, सुश्री संगीता वाघ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


निवृत्तीच्या तरतुदीला प्राधान्य

निवृत्ती हा स्वल्पविराम आहे; पूर्णविराम नाही. हा सध्याच्या भारतीयांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. असे ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स’ या कंपनीने केलेल्या संशोधनातून लक्षात आले आहे. निवृत्ती नियोजन या प्रश्नाकडे सध्या सकारात्मक पद्धतीने बघितले जात आहे. निवृत्ती आनंदात घालवणे, प्रवास करणे, मित्र मंडळींशी भेटीगाठी आणि मनःशांती याकडे या मंडळींचा ओढा आहे. या सगळ्यासाठी आर्थिक तरतूद आवश्यक आहे. या सर्वेक्षणानुसार साधारणपणे रुपये 65 लाख इतकी गंगाजळी निवृत्ती पश्चात आयुष्यासाठी गरजेची आहे असे कंपनीचे विपणन अधिकारी श्री. मनीष दुबे यांनी सांगितले.


उद्योजकता विकास उपक्रम

राज्यातील शालेय मुलांमध्ये उद्योजकता विकसित व्हावी यासाठी पालघर, ठाणे आणि पुणे येथील निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि एनपॉवर या संस्थांनी मिळून हा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाद्वारे मुलांना उद्योजकता विकास व त्यासंबंधीची माहिती देण्यात आली. ही माहिती एनपॉवर चे संस्थापक श्री. सुशील मुणगेकर यांनी दिली.


पर्नोड रिकॉर्ड इंडियाचे इनोव्हेशन सेंटर
ree

पर्नोड रिकॉर्ड या स्पिरिट उद्योगात आघाडीवर असणार्‍या कंपनीचे नाशिक येथे इनोव्हेशन सेंटर उभारले आहे. या सेंटरच्या माध्यमातून डायनॅमिक ट्रेंड-सेटिंग उत्पादन, पॅकिंग प्रक्रिया आदी नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. ही माहिती कंपनीचे चीफ ऑफिसर श्री. राजेश मिश्रा यांनी दिली.


सेवाक्षेत्रात सर्वात मोठी वाढ

देशाच्या ‘जीडीपी’ मध्ये 53 टक्क्यांपेक्षा अधिक वाट असणार्‍या सेवाक्षेत्रात फेब्रुवारी 23 मध्ये सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. ही वाढ 12 वर्षातील सर्वाधिक वाढ आहे. फेब्रुवारी 23 मध्ये सेवाक्षेत्रात पर्सेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) 59.4 वर पोचला होता. जानेवारीत तो 57.2 होता. एस अँड पी ग्लोबल इंडियाच्या मासिक सर्वेक्षणाच्या आधारावर ‘पीएमआय’ 50 च्यावर राहणे वाढीचा संकेत देत असतात.


फॉक्सकॉनची भारतात मोठी गुंतवणूक

अ‍ॅपलची सहकारी तैवानी कंपनी फॉक्सकॉन भारतात सुमारे 5740 कोटींची गुंतवणूक करणार आहे. चीन मधील आपले उत्पादन प्रकल्प बंद करून ते भारतात आणण्यात येणार आहेत यासाठी बंगलोरची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी तीनशे एकर जागा देण्यात आली आहे. गुंतवणूक टप्याटप्याने होणार असून या उद्योगातून सुमारे एक लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.


सोन्याचा 40 वर्षांचा प्रवास
ree

सोन्याचे दर सतत खालीवर होत असतात. भारत हा सर्वाधिक सोनं आयात करणारा देश आहे. सोन्याच्या किंमती कितीही वाढल्या तरी सोने खरेदीची हौस ही कधी कमी होणार नाही. आपल्या माहितीसाठी गेल्या 40 वर्षातील 10 ग्रॅम सोन्याच्या दरांची बोलकी आकडेवारी :

ree

 
 
bottom of page