top of page

आर्थिक घडामोडींचा वेध [ जून २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Jun 2, 2023
  • 3 min read

ree
‘आरबीआय’कडे 790 टन सोने

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडे 2023 वर्ष अखेर 790.20 टन सोने राखीव साठा म्हणून सुरक्षित ठेवण्यात आले आहे. 2022 अखेर 760.42 टन, 2021 अखेर 695.31 टन, 2020 अखेर 653.01 टन तर 2019 अखेर 612.56 टन सोने रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत जमा झाले होते. ही माहिती रिझर्व्ह बँकेनेच एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे.


उड चलोची ‘वीरबाईक’ बाजारात
ree

अग्रगण्य ग्राहक तंत्रज्ञान कंपनी उडचलोने ‘वीरबाईक’ नावाची वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रिक सायकल सादर केली आहे. सशस्त्र दलांमुळे प्रेरित झालेल्या सर्व भारतीयांसाठी शाश्वत आणि परवडणारे वाहतुकीचे पर्याय सादर करण्यासाठी कंपनीने हे पर्यावरण पूरक वाहन सादर केले आहे. याची किंमत 28 हजार आहे.ही बाईक केवळ पर्यावरण पूरक आहे असे नाही तर कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठीही डिझाइन केलेली आहे. ती आयपी रेटेड 65 आणि 67 आहे. टिकाऊ हलक्या वजनाच्या चौकटीसह, इलेक्ट्रिक कट ऑफसह असलेले डिस्क ब्रेक आणि अ‍ॅडजस्ट करता येण्याजोगे सीट आहे. ‘वीरबाईक’ वजनाने देखील हलकी आहे आणि त्यामुळे ती रोजच्या वापरासाठी एक आदर्श पर्याय आहे. माननीय पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या अनुषंगाने या सायकलच्या भारतात सर्व भागांचे उत्पादन भारतात करण्यात आले ही माहिती उड चलोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार यांनी दिली.


साखर उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर

देशात सर्वाधिक साखर उत्पादित करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2022-23 मध्ये महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 105 लाख टन साखरेचे उत्पादन केले. राज्याची वर्षाला साखरेची गरज ही फक्त 35 लाख टन आहे. महाराष्ट्रातील 23 लाख टन साखर निर्यात होते. संपलेल्या गाळप हंगामात 210 साखर कारखान्यांमध्ये गाळप झाले. ही माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.


महाराष्ट्रात 244 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी यंदाच्या वर्षी 244 कोटी लिटर इतक्या इथेनॉलची निर्मिती केली असून मागील वर्षी ही निर्मिती 226 कोटी लिटर इतकी होती. पुढील वर्षीसाठी 300 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने मोलॅसिस आणि धान्यावर आधारित इथेनॉल निर्मिती करण्यासाठी 141 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यासाठी दहा हजार 660 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. ही माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.


भारतात ‘नोमोफोबिया’ व्यक्तींची संख्या अधिक

ओप्पो आणि काऊंटरपॉईंट या दोन मोबाईल क्षेत्रातील कंपन्यांनी केलेल्या संशोधनानुसार भारतात नोमोफोनिया “लो बॅटरी अ‍ॅनझायरी कंझ्युमर स्टडी” ग्राहकांची संख्या वाढत आहे. या संशोधनानुसार 65 टक्के स्मार्टफोन वापरकर्त्यांना त्यांच्या फोनची बॅटरी कमी होते तेव्हा भाविनक अस्वस्थता, चिंता, असुरक्षितता, महत्त्वाची माहिती न मिळण्याची भीती सतावते. बॅटरी उतरु नये म्हणून अनेकजण फोनचा व सोशल मीडियाचा वापर टाळतात असे आढळून आले आहे. आपण फोनशिवाय जगू शकत नाही या फोबियाने भारतात अनेकजण त्रस्त आहेत असे ओप्पो इंडियाचे सीईओ दमयंतसिंग खनोरिया यांनी सांगितले.


टिळक महाराष्ट्र विद्यापीठात व्यावसायिक अभ्यासक्रम

पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने पुरातन विद्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. विद्यापीठाच्या 103 व्या वर्धापनदिनी कुलगुरु डॉ. गीताली टिळक यांनी ही माहिती दिली. नुकतेच आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला आयएसओ 21001:2018 हे प्रमाणपत्र प्रदान केले आहे. असेही डॉ. टिळक यांनी सांगितले.


नितीन कुकरेजा ‘अ‍ॅलन’चे सीईओ

अ‍ॅलेन करियर इन्स्टिट्यूट प्रा. लि. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नितीन कुकरेजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अ‍ॅलन करियर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ब्रजेश माहेश्‍वरी यांनी ही नियुक्ती केली आहे. अ‍ॅलन इन्स्टिट्यूट मोठ्या प्रमाणावर डिजिटल माध्यमाचा वापर करीत असून सध्या त्याच्या 3 लाख विद्यार्थ्यांची संख्या अडीच कोटी पर्यंत वाढविण्याची इन्स्टिट्यूटची योजना आहे.


‘सीएसआर’ अंतर्गत 14 हजार कोटी खर्च

कॉर्पोरेट सोशल रिस्पाँसिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत सन 22 अखेर भारतातील 1278 कंपन्यांनी रु. 14558 कोटी रुपये विविध शैक्षणिक, सामाजिक किंवा विकास कामांवर खर्च केले आहेत. ‘सीएसआर’ कायद्यानुसार रु. 500 कोटींपेक्षा जास्तची उलाढाल असणार्‍या कंपन्यांना ‘सीएसआर’ अंतर्गत काही रक्कम खर्च करावी लागते. मागील वर्षी (2021 मध्ये) 1251 कंपन्यांनी 14,615 कोटी रु., तर सन 2020 मध्ये 1182 कंपन्यांनी रु. 14,840 कोटी ‘सीएसआर’ च्या माध्यमातून खर्च केले होते. यामधील सर्वाधिक खर्च हा महाराष्ट्र (41944 कोटी), गुजरात (920 कोटी), दिल्ली (847 कोटी), कर्नाटक (839 कोटी) आणि तामिळनाडू (761 कोटी) या राज्यातील शिक्षण, आरोग्य, सामाजिक आणि विकासात्मक कामावर खर्च झाले आहे.


बास्किन रॉबिन्सची पुण्यात महत्त्वाकांक्षी विस्तार योजना
ree

आईस्क्रीमच्या दुकानांच्या जगातील सर्वात मोठ्या शृंखलांपैकी एक, बास्किन रॉबिन्सची आईस्क्रीम्स पुण्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असून त्यांची मागणी सातत्याने वाढत असल्याचे ब्रँडच्या निदर्शनास आले आहे. आपल्या ग्राहकांच्या मागण्या आणि आवडीनिवडी ध्यानात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी बास्किन रॉबिन्सने आपल्या उत्पादनांमध्ये नवीन फॉरमॅट्स आणि स्वादांची भर टाकली आहे. ही माहिती ग्रॅव्हिस फूड्स प्रायव्हेट लिमिटेड - बास्किन रॉबिन्सचे सीईओ मोहित खटटर यांनी दिली. यंदाच्या उन्हाळ्यासाठी बास्किन रॉबिन्सने 17 नवीन उत्पादने सादर केली आहेत. यामध्ये कॅरॅमल मिल्क केक, ब्ल्यूबेरी आणि व्हाईट चॉकलेट तसेच फ्रुट निन्जा यांचा समावेश आहे. आईसक्रीम फॉरमॅट्समध्ये आईसक्रीम रॉक्स नवीन आहे, यामध्ये स्वादिष्ट चॉकलेटचा थर असलेली बाईट साईझ आईस्क्रीम्स आहेत, आईस्क्रीम पिझ्झा, आईसक्रीम फ्लोट्स, फ्रुट क्रीम संडे आणि फेरीटेल संडे यांचा देखील त्यामध्ये समावेश आहे.

 
 
bottom of page