top of page

आर्थिक घडामोडींचा वेध [ मे २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Apr 28, 2023
  • 3 min read

ree









इंटरनॅशनल ट्रॅक्टर्सची भरवी कामगिरी
ree

इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडने (आयटीएल) आर्थिक वर्ष 23 चा धडाकेबाज प्रवास पूर्ण केला आहे. भारतातील नंबर एक ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या आयटीएलने आपल्या प्रयोगशील वाटचाल आणि शेतकरी केंद्रित दृष्टीकोनाचा पूर्ण वापर करून आजवरच्या 151160 ट्रॅक्टर्सच्या सर्वात मोठ्या वार्षिक विक्रीची नोंद केली आहे. या नेत्रदीपक कामगिरीमुळे कंपनीकडे तब्बल 14.1 टक्के मार्केट शेअर आहे. इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, आर्थिक वर्ष 23 हे आयटीएलमधील हे सर्वात मोठे वर्ष आहे कारण यंदा आम्ही आमची सर्वाधिक वार्षिक 151160 ट्रॅक्टरची विक्री नोंदवली आहे, हे जाहीर करताना मला आनंद होतो.


बोलके आकडे

महिनाभरापूर्वी सन 2022-23 हे अर्थिक वर्ष समाप्त झाले. मार्च 2023 या महिन्याचे जीएसटी कलेक्शन एक लाख 60 हजार कोटी रु. इतके झाले. हा टप्पा जीएसटी लागू झाल्यापासून फक्त दुसर्‍यांदा पार झाला आहे. वर्षात सर्वात जास्त कलेक्शन एप्रिल 2022 चे कलेक्शन 1.68 लाख कोटी रु. इतके झाले होते. यंदा अर्थिक वर्ष 2022-23 चे एकूण कलेक्शन 18.10 लाख कोटी रु. (महिना सरासरी 1.51 लाख कोटी रु.) आहे. नुकतेच आर्थिक वर्षात जमा झालेल्या एकुण आयकराचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. यानुसार ग्रॉस कलेक्शन 19.68 लाख कोटी रु. आहे. रिफंड वजा करून निव्वळ आयकरापोटी 16.62 लाख कोटी रु. जमा झाले आहेत.

कॉर्पोरेट आयकरामध्ये 16.91% तर नॉन कॉर्पोरेट आयकरामध्ये 24.23% इतकी वाढ झाली आहे. या नॉन कॉर्पोरेट आयकरामध्ये पर्सनल आयकर आहे. कॉर्पोरेट आणि नॉन कॉर्पोरेट यांचा हिस्सा अनुक्रमे 51% आणि 49% इतका आहे.


क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी श्री. रणजित नाईकनवरे यांची बिनविरोध निवड
ree

क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या राष्ट्रीय संघटनेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. रणजित नाईकनवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष श्री. अनिल फरांदे यांच्याकडून श्री. रणजीत नाईकनवरे हे क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत नाईकनवरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे हे बांधकाम व्यवसाय क्षेत्रात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असून नाईकनवरे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीचे ते संचालक आहेत. क्रेडाई पुणे मेट्रो विषयी - क्रेडाई पुणे मेट्रो ही पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मधील खासगी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असून 1982 साली तिची स्थापना झाली आहे. देशभरातील सुमारे 13 हजारपेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिक या संघटनेचे सदस्य आहेत. देशातील 21 राज्यांमध्ये असलेल्या 217 शाखांच्या माध्यमातून संस्थेचे कामकाज चालते. 500 हून अधिक महत्त्वाचे बांधकाम व्यवसायिक आणि 1500 रेरा सभासद यांचा समावेश क्रेडाई पुणे मेट्रोमध्ये आहे. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील 70 टक्के बांधकाम करणार्‍या अशा प्रमुख बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग आहे.


50 टक्के वाहनांचा विमा नाही

मोटार वाहन कायद्यानुसार रस्त्यावर धावणार्‍या प्रत्येक वाहनांचा विमा काढणे हे अपरिहार्य आहे. नाहीतर नियमानुसार दंड भरावा लागतो. असे असताना देशातील एकूण 30 कोटी 5 लाख वाहनांपैकी फक्त 16 कोटी 5 लाख वाहनांचा विमा उतरविला आहे. अन्य वाहने ही विम्या शिवाय धावतात. गेल्या काही वर्षात रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याचा विचार करता विमा ही काळाची गरज आहे. ही माहिती मंत्री महोदयांनी लोकसभेतील प्रश्‍नोत्तरात दिली.


रु.8800 कोटींच्या मालमत्ता जप्त

आयकर खात्याने 2014-15 ते 2021-22 या कालावधी देशात एकूण 5931 धाडी (Search Opreations) केले. या धाडीतून एकूण 8 हजार कोटी रुपयांची संपत्ती/मालमत्ता जप्त करण्यात आली. ही माहिती मंत्री महोदयांनी लोकसभेतील प्रश्‍नोत्तरात दिली.


‘टीजजेएसबी’ बँकेला मार्च 23 अखेर 173 कोटींचा निव्वळ नफा

ठाणे जनता सहकारी बँक लि. (टीजेएसबी) ला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात (2022-23) 173 रु. कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. यावर्षात बँकेच्या निव्वळ अनुत्पादन कर्जाचे प्रमाण शून्य आहे. बँकेची एकूण उलाढाल 20 हजार 954 कोटी रुपये झाली आहे. बँकेने निकाल नुकतेच प्रसिद्ध केले आहेत.


16 व्या फायनान्स कमिशनची लवकरच स्थापना

केंद्र सरकार या वर्षात 16 व्या फायनान्स कमिशनची स्थापना करणार आहे. विविध करांची विभागणी केंद्र व राज्य अशी करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. याची अंमलबजावणी एप्रिल 2026 पासून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 15 व्या फायनान्स कमिशनचे कामकाज सध्या चालू असून त्याचे अध्यक्षपद एन. के. सिंग हे भूषवित आहेत. फायनान्स कमिशनची नियुक्ती घटनेनुसार केली जाते. केंद्र व राज्यांना कर विषयक व धार्मिक घडामोडी संबंधी सल्ला देण्याचे काम हे कमिशन करते.


बँकेतून थेट ‘पीपीएफ’ व ‘पोस्टाच्या बचत खात्यात’ पैसे जमा करता येणार

आता ग्राहक आपल्या बँक खात्यातून थेट पोस्ट ऑफिस बचत खाते, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) सुकन्या समृद्धी खात्यात (एमएमए) NEFT व RTGS द्वारे पैसे हस्तांतरित करु शकतील. यासाठी लाभार्थी (बेनिफिशियर) जोडण्याची आवश्यकता नाही. ही सुविधा केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने एक विशेष आदेशानुसार उपलब्ध करुन दिली आहे.


सेवा क्षेत्राची वाढ मंदावली

देशाच्या सेवा क्षेत्राची वाढ मार्च 23 मध्ये मंदावली आहे. सेवा क्षेत्राने फेब्रुवारी 23 मध्ये 12 वर्षातील उच्चांकी कामगिरी नोंदवली होती. सेवा क्षेत्राचा S & P ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस ‘पीएमआय’ निर्देशांक मार्च महिन्यात 57.8 गुणांवर होता. फेब्रुवारी 23 मध्ये तो 594 गुणांवर होता.


 
 
bottom of page