top of page

इनपुट टॅक्स वजावट करदात्याची जबाबदारी [ जून २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Jun 2, 2023
  • 2 min read

ree

जीएसटी कायदा अंमलात येण्याअगोदर व्हॅट कायदा अंमलात होता. व्हॅट कायद्यात काही अपवाद वगळता नोंदित व्यापार्‍याला खरेदीवर भरलेल्या कराचा सेटऑफ म्हणजेच विक्रीवरील करामधून खरेदीवर भरलेल्या कराची वजावट करून उर्वरित मालावर कर भरण्याची तरतूद होती. व्हॅट कायद्यातील सेटऑफच्या तरतुदीप्रमाणेच काही अपवाद वगळता खरेदीवर भरलेल्या कराची विक्रीवरील करामधून वजावट घेऊन शिल्लक राहिलेल्या मालावरील कर भरण्याची तरतूद जीएसटी कायद्यात केलेली आहे.

जीएसटी कायद्यात इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याची तरतूद कलम 16,17,18,19 आणि 20 मध्ये नमूद आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविण्याच्या बाबतीत माल खरेदी करणार्‍या करदात्याची काय जबाबदारी आहे? या मुद्यावर सुप्रीम कोर्टापुढे 13 मार्च 2023 रोजी [ मे. इ.कॉम गिल ऑफ ट्रेडिंग सिव्हिल अपील नं. 230 (2023) 148 टॅक्समन.कॉम 352 ] मुद्दा आला होता. ही केस व्हॅट कायद्याच्या कलम 70 ला अनुसरून आहे.

हायकोर्टाने निर्णय दिला होता की, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठी खरेदी करणार्‍या व्यक्तीने खरेदी इनव्हॉईस आणि त्या बाबतीत चेकने दिलेल्या पेमेंटचा पुरावा पुरेसा आहे. हायकोर्टाच्या या निकालाविरुद्ध केलेल्या अपिलात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिलेला आहे की, खरेदी करणार्‍या व्यापार्‍याने खरेदी इनव्हॉईस आणि त्याचे चेकने केलेल्या पेमेंटचा पुरावा बरोबर मालाचा पुरवठा ज्या वाहनाने केलेला आहे त्याचा तपशील, भाडे दिल्याचा पुरावा, माल मिळाल्याचा पुरावा आणि मालाची वाहतूक झालेली आहे याबाबतीतही माहिती पुरविणे जरूरीचे आहे.

ree

In fact the genuineness of the transaction has to be proved as the burden to prove the genuineness of transaction would be upon the purchasing dealer. At the cost of repetition, it is observed and held that mere production of the invoces and/or payment by cheque is not sufficient and cannot be said to be proving the burden.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय व्हॅट कायद्याखाली असला तरी जीएसटी कायद्याखालीही इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठी खरेदीचा व्यवहार खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे इनव्हॉईस आणि त्याचे चेकने पेमेंट केल्याबद्दलच्या पुराव्याबरोबर मालाची वाहतूक झाली आहे (Physical movement of the goods) हेही इनपुट टॅक्स क्रेडिट घेणार्‍या करदात्याला सिद्ध करणे जरूरीचे आहे.


 
 
bottom of page