“कृषी उद्योजकतेची सुवर्णसंधी”- शेतकरी उत्पादक कंपनी - श्री. देवेंद्र मधुकर सूर्यवंशी [ जून २०२३ ]
- Vyapari Mitra
- May 30, 2023
- 2 min read

आपला देश कृषिप्रधान व अर्थव्यवस्था कृषिकेंद्रीत असली तरी शेतकर्यांच्या जीवनमानात स्वातंत्र्योत्तर काळातही बदल झालेला नाही. शेतीमुळे देशाच्या अर्थकारणाला गती मिळत असली तरी शेतकर्यांची अधोगती व फरफट चालू आहे. अंतिम ग्राहक शेतमालास जी किंमत देतो त्याच्या फक्त 10% रक्कम बळीराजाला मिळते, हे भीषण चित्र आहे. लेखक स्वत: भूमीपुत्र असल्याने त्यांनी प्रश्नावर आपल्या परीने उपाय शोधलेला आहे. तो म्हणजे शेतीला उद्योग-व्यवसायाची जोड देणे. शेतमाल अंतिम ग्राहकापर्यंत जाईपर्यंत त्याला अनेक प्रक्रियांतून जावे लागते, त्याला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावे लागते. तथापि शेती सांभाळून शेतकर्याला हे करणे शक्य नसते. मात्र “शेतकरी उत्पादक कंपनी” अर्थात एफपीसीच्या माध्यमातून हे सहज शक्य होते. एफपीसीच्या माध्यमातून शेतकर्याने उद्योजकतेकडे वाटचाल करावी, हे सांगण्याचा या पुस्तकाचा उद्देश आहे.
एफपीसीची नोंदणी प्रक्रिया, त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे, एफपीसीची संचालन पद्धती, त्यांचे अधिकार व जबाबदार्या, एफपीसी अंतर्गत सुरु करता येणारे उद्योग, शेतीशी पूरक उद्योग, त्यासाठीच्या शासकीय योजना व अनुदाने, कर्ज उभारणीचे पर्याय, एफपीसीला लागू होणारे कायदे, परवाने व परवानग्या इत्यादी बाबतचे इत्थंभूत मार्गदर्शन या पुस्तकात आहे. शेतकर्यांच्या संघटनांशी असलेल्या सान्निध्यामुळे लेखकाला शेतकर्यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळेच या पुस्तकातील माहिती व्यवहार्य, वास्तवदर्शी व उपयुक्त झालेली आहे. अॅफेसर नावाच्या संस्थेद्वारा महाराष्ट्रातील अनेक शेतकर्यांना एफपीसी बरोबर जोडलेले आहे व त्यांना कृषिविषयक मार्गदर्शन करुन समृद्धीच्या दिशेने नेलेले आहे. या पुस्तकामुळे व त्यातील माहितीमुळे कृषी क्षेत्रास नवसंजीवनी मिळेल, यात शंका नाही.
लेखक : श्री. देवेंद्र मधुकर सूर्यवंशी,
मो. 98815 76506
प्रकाशक : युनाइट पब्लिकेशन,
धुळे - 424 002, मो. 82085 74289.
पृष्ठे - 67, मूल्य - रु. 149
करविषयक मासिकांमध्ये व्यापारी मित्र सर्वोत्तम
मागील पाच वर्षापासून मी व्यापारी मित्र या मासिकाचा नियमित वाचक आहे. सध्या उपलब्ध असणार्या करविषयक आणि आर्थिक घडामोडींची माहिती देणार्या मासिकांमध्ये “व्यापारी मित्र” हे मासिक मला सर्वोत्तम वाटते.
अद्ययावत आकडेवारी, कायद्यातील अद्ययावत बदल, त्या संबंधित असणार्या विविध केस स्टडीज या सर्वांचा अत्यंत सोप्या सुटसुटीत भाषेत लेखाजोखा मासिकात दिलेला असतो.
याचा खूप मोठा फायदा माझ्यासारखे व्यावसायिक, कर खात्यात कार्य करणारे अधिकारी, वकील व सर्वसामान्य नागरिक या सर्वांनाच होतो. आपल्या या कौतुकास्पद कार्यास माझ्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा !