top of page

जीएसटी : अ‍ॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीचे निर्णय [ मे २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Apr 29, 2023
  • 2 min read

ree







23) एएआरच्या निर्णयात चूक नसेल तर अर्ज करता येत नाही

केसची हकीकत : अपीलकर्ते इमारत बांधून निवासी घरांची विक्री करण्याचा व्यवसाय करीत आहेत. त्यांनी जमीन मालकांसोबत जॉईंट डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट करून अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत. अशा प्रकल्पात जमीन मालकाचा हिस्सा विशिष्ट प्रमाणात ठेवला जात होता. अशा जेडीए प्रकल्पांचे बांधकाम जीएसटी लागू होण्यापूर्वी सुरू झालेले असून ते जीएसटी उत्तर काळात पूर्ण झाले आहेत. अशा जीएसटीपूर्व जॉईंट डेव्हलपमेंट प्रकल्पातील जमीन मालकाच्या हिश्यांबाबत जीएसटी करदेयता निर्धारणासाठी अपीलकर्त्याने अ‍ॅडव्हान्स रुलिंग अधिकार्‍यांकडे अर्ज दाखल केला. एएआरने जीएसटी पूर्व जॉईंट अ‍ॅग्रीमेंट अंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पातील जमीन मालकाच्या हिश्यांवरील रकमेबाबत जीएसटी भरावा लागेल, असा निर्णय दिला. तथापि, एएआरने पारित केलेल्या सदोष निर्णयाबाबत रेक्टिफिकेशन ऑर्डर काढावी म्हणून अर्ज केला. परंतु पारित केलेल्या आदेशात कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन अ‍ॅपलेट एएआरने केले. अपिलीय एएआरच्या निरीक्षणाप्रमाणे कनिष्ठ एएआरच्या निर्णयात जीएसटी कायद्याप्रमाणे दोष असेल तरच अपील करता येते. प्रस्तुत केसच्या निर्णयात कोणताही दोष आढळून येत नाही. त्यामुळे त्यामध्ये रेक्टिफिकेशन (सुधारणा) करण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. कनिष्ठ एएआरच्या आदेशाबाबत अपील करता येत नसल्याचा आदेश अपिलीय एएआरने दिला.


[ दुर्गा प्रोजेक्टस अँड इन्फ्रा (प्रा.) लि. 2021 (कर्नाटक) जीएसटी केसेस व्हॉ. 84/4, पान ए-3 ]

24) प्रवासी वाहतुकीसाठी केलेला बस पुरवठा भाडोत्री वाहन सेवा पुरवठ्याअंतर्गत करमाफ

केसची हकीकत : प्रवासी वाहतुकीसाठी केलेला बस पुरवठा हा भाडोत्री वाहन सेवा पुरवठ्या अंतर्गत येतो ज्यामध्ये वाहन भाडे तत्त्वावर देणे समाविष्ट असते. त्याचा समावेश नोटिफिकेशन नं. 12/2017 सीटी (रेट) मधील नोंद क्र. 22 मध्ये होतो. त्यानुसार ती करमुक्त सेवा ठरते. त्यामुळे जीएसटी कर आकारणी पात्र नाही.


[ वीरेंद्र कुमार जैन व मनोरकुमार चौबे माँ असोसिएट्स एएआर (म.प्र.) (2022) जीएसटी केसेस व्हॉ. 94/2, पान 183 ]

25) दवाखान्या अंतर्गत पुरविण्यात येणार्‍या विविध सेवांबाबत

केसची हकीकत : दवाखान्यात दाखल झाल्यापासून ते डिसचार्ज मिळेपर्यंत रुग्णाला बरे वाटावे म्हणून डॉक्टरांच्या निर्देशांप्रमाणे पुरवण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या सेवा आरोग्याबाबतच्या कंपोझिट पुरवठ्या अंतर्गत समाविष्ट होतात व त्यांचा अंतर्भाव ‘इन पेशंट सर्व्हिस’ म्हणून एसएसी 999311 मध्ये होतो.

दाखल केल्यापासून ते डिसचार्ज मिळेपर्यंत दवाखान्यात दिल्या जाणार्‍या इनपेशंट सर्व्हिस औषधे, इम्प्लांट व अन्य उपभोग्य वस्तू याबाबतच्या सेवांचा अंतर्भाव कंपोझिट सप्लाय अंतर्गत होतो व त्या सेवा नोटिफिकेशन नं. 12/2017 सीटी (आर) च्या नोंद क्र. 74 प्रमाणे करमुक्त असतात.

आऊट पेशंटला औषधांसह दिल्या जाणार्‍या सेवा कंपोझिट पुरवठ्याअंतर्गत येत नाहीत. कारण आरोग्य-विषयक कन्सल्टेशन व औषध पुरवठा या सेवा नैसर्गिकदृष्ट्या एकमेकांस पूरक नाहीत.

हॉस्पिटल अंतर्गत असलेल्या औषध दुकानातून आऊट पेशंटने खरेदी केलेले औषध हा स्वतंत्र औषध पुरवठा असतो व त्याला नोटिफिकेशन नं. 12/2017 च्या नोंद क्र. 74 प्रमाणे करमुक्तीचा लाभ घेता येत नाही.


[ बी वेल हॉस्पिटल्स (प्रा.) लि. एएआर (तामिळनाडू) (2022) जीएसटी केसेस व्हॉ. 94/2, पान 208 ]
 
 
bottom of page