top of page

जीएसटी कायद्यासंबंधी सल्ला [जाने २०२३]

  • Vyapari Mitra
  • Mar 25, 2023
  • 5 min read

Updated: Apr 1, 2023


ree

कर आणि दंड भरल्यावर जप्त केलेला माल सोडविण्यासाठी बँक गॅरंटी द्यावी लागत नाही प्रश्‍न 1 : माल जप्त केल्याच्या बाबतीत कर आणि दंड भरलेला आहे, तसेच नियमाप्रमाणे बाँडही दिलेला आहे. अधिकारी त्या बाबतीत बँक गॅरंटीची मागणी करीत आहेत अशा परिस्थितीत बँक गॅरंटीची मागणी करणे कायद्याला धरून आहे का? उत्तर : गुजरात हायकोर्टाने एबी ट्रेडर्स या केसमध्ये दिलेल्या निर्णयातील (R) Special Civil Application No.18393 of 2021. December 24, 2021 [ संदर्भ जीएसटी केसेस 91 (7) पान 703 ] मधील मुद्दे विचारात घेता आपल्या प्रश्‍नातील मुद्यांच्या बाबतीत अधिकार्‍याला बँक गॅरंटीची मागणी करता येत नाही.

ड्रेनेज लाईन टाकून जमीन विकल्यास जीएसटी भरावा लागत नाही प्रश्‍न 2 : आम्ही जमीन सपाट करून (Levelling) व ड्रेनेज लाईन टाकून (Laying down of drainage lines) त्याची विक्री करतो. त्यावर जीएसटी भरावा लागतो का? उत्तर : जीएसटी कायद्याचे परिशिष्ट III मधील सीरियल नं. 5 प्रमाणे जमीन (Land) विक्रीचा मालाच्या पुरवठ्यामध्ये समावेश होत नाही आणि सेवेच्या पुरवठ्यामध्येही समावेश होत नाही. सर्क्युलर नं. 177/9/2022 - टीआरयू [ सीबीआयसी 190354/ 176/2022 - टीआरयू ] ता. 3.8.2022 संदर्भ जीएसटी केसेस व्हॉ. 92(7) पान 113 (सर्क्युलर) मध्ये याबाबतीत खुलासा केल्याप्रमाणे “Land may be sold either on it is or after some development such as levelling, laying down of drainage lines, water lines, electricity lines etc. It is clarified the sale of such develpoed land is also sale of lane and is covered by Sr.No. 5 of Schedule III of the central goods and services Tas,Act 2017 and accordingly does not attract GST.’’ [ नोट : पहा गुजरात हायकोर्ट निर्णय Munjaal Manishbhai bhatt (R) Special Civil Application No . 1350 & 6840 of 2021 & 5052 of 2022 , May 6, 2022, Ref. (2022) 92 GST 327/ 138 taxmann.com 117 (Gujrat) GST is not payable on sale of developed land if such development activity has been undertaken with prospective buyer ] परिशिष्ट III मधील सीरियल नं. 5, सर्क्युलर नं. 177 आणि गुजरात हायकोर्टाचा निर्णय विचारात घेता गुजरात अ‍ॅपलेट ऑथॉरिटीने दिपेश अनिलकुमार नाईक या केसमध्ये दिलेला निर्णय [ No. GUJ / GAAAR / Appeal / 2021/35 Dec. 22, 2021 संदर्भ जीएसटी केसेस व्हॉ. 90 (9) पान 914 ] "Sale of deceloped plot is different from sale of land and is covered under supply of construction service under Sr.No.3 of Notification No. 11 (2017) - Central Tax (rate) attreacting GST at 18% आहे. याबाबतीत फेरविचार होणे जरूरीचे आहे.
वेअरहाऊस (Warehouse) च्या खरेदीवर भरलेल्या जीएसटीचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही प्रश्‍न 3 : आमचा केमिकल्सचा व्यवसाय आहे या व्यवसायाबरोबर भाड्याने देण्यासाठी वेअरहाऊस बांधलेले आहे. त्याच्या बांधकामासाठी खरेदी केलेल्या मालावर भरलेल्या जीएसटीचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल का? उत्तर : जीएसटी कायद्याचे कलम 17(5)(डी) मधील तरतूद आणि हरियाणा अ‍ॅपलेट अ‍ॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने मे. धिंगरा ट्रकिंग प्रा. लि. या केसमध्ये [ Appeal No. HAAAR/2020-21/03 dated 28.3.2022 Ref. GST and MAH Tax News 2022 Service No. 34 (35) S.No. 1 ] दिलेल्या निर्णयाप्रमाणे भाड्याने देण्यासाठी बांधलेल्या वेअरहाऊस-साठी खरेदी केलेल्या मालावर भरलेल्या जीएसटीचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही.
पिझा टॉपिंग (Pizza Topping) वर जीएसटीचा दर प्रश्‍न 4 : आम्ही पिझ्झा टॉपिंग तयार करतो. यामध्ये अन्य पदार्थांबरोबर चीज (Cheese) चाही वापर करतो. चीजचा उपयोग साधारणपणे 15 टक्के पर्यंत असतो. यावर किती टक्के जीएसटी भरावा लागेल? उत्तर : आपण पिझ्झा टॉपिंग तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पदार्थांबरोबर चीजचाही साधारणपणे 15 टक्केपर्यंत वापर करता. म्हणजेच सदर चीज टॉपिंगमध्ये चीज हा प्रमुख घटक म्हणून वापरला जात नाही. परिशिष्ट II मधील नोंद क्रमांक 13 मध्ये चीज (एचएसएन कोड 0406) चा उल्लेख आहे. म्हणजेच मुख्यत: चीजपासून केलेल्या वस्तूंवर कराचा दर 12 टक्के आहे. आपण तयार केलेल्या पिझ्झा टॉपिंगमध्ये चीज मुख्य पदार्थ नसतो म्हणून परिशिष्ट III मधील नोंद क्रमांक 23 आणि हरियाणा अ‍ॅपेलेट ऑथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगने खेरा ट्रेडिंग कं. या केसमध्ये दिलेल्या निर्णयातील मुद्दे विचारात घेता (HAR/HAAAR) 2018-19/06 August 7 (2019) संदर्भ जीएसटी केसेस व्हॉ. 91(4) पान 437 त्यावर जीएसटीचा दर 18% आहे.
डायग्नोस्टिक अँड लॅबोरेटरी रिजेन्टसवर जीएसटीचा दर प्रश्‍न 5 : डॉयग्नोस्टिक अँड लॅबोरेटरी रिजेन्टसवर जीएसटीचा दर किती टक्के आहे? उत्तर : सर्क्युलर नं. 163/19/2021 - जीएसटी 6.10.2021 मधील पॅरा 10 मध्ये खुलासा केल्याप्रमाणे डॉयग्नोस्टिक अँड लॅबोरेटरी रिजेन्टसचा परिशिष्ट खख मधील नोंद क्रमांक 80 (All Diagnostic Kits and Reagents) मध्ये समावेश होतो. या नोंदीतील तपशील (एचएसएन कोड नं. 3822) आणि कर्नाटक अ‍ॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने Bio-Rad Laboratories India Ltd. या केसमध्ये दिलेल्या निर्णयातील मुद्दे विचारात घेता ( Order No. KAR ADRG 78/2021, December 17, 2021) संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 91 (6) पान 592 मध्ये वर उल्लेख केलेल्या मालावर जीएसटीचा दर 12 टक्के आहे.
विक्री वाढविण्यासाठी रिटेल व्यापार्‍यांना दिलेल्या बक्षिसाच्या खरेदीवर भरलेल्या जीएसटीचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही प्रश्‍न 6 : आम्ही धंद्यातील विक्री वाढविण्यासाठी रिटेल व्यापार्‍याने आम्ही उत्पादित केलेल्या मालाची ठराविक विक्री केल्यास अन्य ठराविक मालाचे गिफ्ट (बक्षीस) देतो. सदर गिफ्ट बाबतीत त्यांचेकडून काहीच मोबदला घेत नाही. गिफ्ट देण्यासाठी खरेदी केलेल्या मालावर भरलेल्या जीएसटीचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल का? उत्तर : जीएसटी कायद्याचे कलम 17(5)(एच) मधील तरतूद (...or disposed of by way of gift or free samples) आणि तामिळनाडू अ‍ॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने GRB Diary Food (P) Ltd. (2021) संदर्भ जीएसटी केसेस व्हॉ. 88(9) यलो पेज ए-4 मध्ये दिलेल्या निर्णयातील मुद्दे विचारात घेता (...The rewards were not in the nature of discounts to the products but were in the nature of personal consumables and therefore they would qualify to be termed as gifts) आपल्या व्यवहाराचा तपशील विचारात घेता रिटेलर व्यापार्‍याने आपल्या उत्पादित मालाची ठराविक मर्यादेपर्यंत विक्री केल्यास त्यांना अन्य मालाचे जे गिफ्ट देता, त्याच्या खरेदीवर भरलेल्या जीएसटीचे आपणास इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही.
स्वेज ट्रीटमेंट प्लांटद्वारे प्रक्रिया केलेला पाणी करमुक्त आहे प्रश्‍न 7 : सांडपाणी प्रक्रिया प्लान्टद्वारे (Sewage Treatment Plant) प्रक्रिया केलेल्या पाण्यावर जीएसटी भरावा लागतो का? उत्तर : महाराष्ट्र अ‍ॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स लि. [ 132 taxmaa.com 247 (AAR-Mah.Ref. 2022 Service No. 24 (12) ] मध्ये निर्णय दिला होता की परिशिष्ट III मधील नोंद 24 प्रमाणे स्वेज ट्रीटमेंट प्लांटद्वारे प्रक्रिया केलेल्या पाण्यावर जीएसटीचा दर 18 टक्के आहे. या निर्णयाविरुद्ध अ‍ॅपेलेट ऑथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगने निर्णय दिलेला आहे की संबंधित पाण्यावर करमुक्त परिशिष्ट मधील नोंद 99 प्रमाणे कराची माफी आहे. [ Order No.MAH/AAAR/AM-02/2022-23 April/2022 ] संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 92(3) पान 368
ई-वे बिलात फक्त तारखेसंबंधी त्रुटी असल्यास कलम 129 प्रमाणे दंड लावणे योग्य नाही प्रश्‍न 8 : आमच्या ई-वे बिलात मालाच्या तपशिलात, माल पाठविणारा आणि घेणार्‍या व्यक्तीच्या नावात, मालाची डिलीव्हरी इनव्हॉईस नं., मालाची किंमत एचएसएन कोड नं. गाडीचा नंबर इ. बाबतीत काहीच त्रुटी नाहीत, फक्त नजरचुकीने ई-वे बिलातील तारखेत चूक झालेली आहे. अशा परिस्थितीत काही दंड होऊ शकतो का? उत्तर : आपल्या केसमध्ये फक्त ई-वे बिलात नजरचुकीने तारीख लिहण्यामध्ये चूक झालेली आहे. अशा परिस्थितीत सर्क्युलर नं. 64/38/2018/ जीएसटी, ता. 14 सप्टेंबर 2018 मध्ये खुलासा केल्याप्रमाणे कलम 125 मधील तरतुदीप्रमाणे सीजीएसटी आणि एमजीएसटी मिळून एक हजार रुपये दंड होईल. कलम 129 मधील तरतुदीप्रमाणे “Penalty equal to two hundred percent’’ होणार नाही, आणि करमुक्त मालाच्या बाबतीत मालाच्या किंमतीच्या दोन टक्के किंवा पंचवीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी होईल त्याप्रमाणे दंड होणार नाही. पहा High Court of Kerala Greenlights Power Solutions W.P. (C) No. 77/6 of 2021 April 6 (2022) संदर्भ जीएसटी केसेस व्हॉ. 92(7) पान 693 [ and High Court of Uttarakhand Sonal Automation Industries 27.4.2022 ] संदर्भ जीएसटी केसेस व्हॉ. 92(9) पान 900.



 
 
bottom of page