जीएसटी कायद्यासंबंधी सल्ला [ जुलै २०२३ ]
- Vyapari Mitra
- Jul 27, 2023
- 4 min read
Updated: Jul 28, 2023
जीएसटी कायद्यासंबंधी सल्ला

आकारणीत नमूद केलेल्या मुद्यांची माहिती न देता केलेली आकारणी कायद्याला धरून नाही
प्रश्न 44 : आकारणी निर्णयात पुष्कळ असे मुद्दे नमूद केलेले आहेत ज्यांची माहिती आम्हास कळविलेली नाही. आम्हाला त्या बाबतीत माहिती दिली असती तर आम्ही खुलासा केला असता. अशा प्रकारे माहिती न देता मुद्यावर आधारित आकारणी निर्णय योग्य आहे का?
उत्तर : आपल्या प्रश्नाच्या बाबतीत आंध्र प्रदेश हायकोर्टाने एम.आर. मेटल्स या केसमध्ये [(रिट पिटीशन नं. 31148 (2022) ता. 29.9.2022 संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 95(7) पान 702 ] दिलेल्या निर्णयातील मुद्दे विचारात घेता (...We are of the view that the assessing authority ought to have furnished the materials enabling the petitioner to make a representation or produce any material contra to the same, to substantiate his plea non furnishing of the same, in our view, would be violation of principles of natural justice...) प्रमाणे माहिती न दिलेल्या मुद्यावर जो आकारणी निर्णय दिलेला आहे तो कायद्याला धरून दिसत नाही.
तपासणी चालू असताना ब्लॉक केलेले बँक अकौंट चालू करण्यासाठी द्यावयाच्या बँक गॅरंटीमध्ये कर रकमेचा समावेश करावा लागतो
प्रश्न 45 : आमच्या केसमध्ये खोट्या खरेदी बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याच्या कारणावरून तपासणी चालू आहे. आमचे बँक अकौंट ब्लॉक करण्यात आलेले आहे. ब्लॉक उठविण्यासाठी इनपुट टॅक्स रकमेच्या बाबतीत बँक गॅरंटी देण्यास तयार आहोत. परंतु अधिकार्यांचे म्हणणे आहे की, बँक गॅरंटीमध्ये कर रकमेबरोबर व्याज आणि दंडाचाही समावेश करायला पाहिजे.
उत्तर : आपण इनपुट टॅक्स क्रेडिट चुकून घेतलेले आहे. या बाबतीत तपासणी चालू आहे. तर ब्लॉक केलेला बँक अकौंट उठविण्यासाठी इनपुट टॅक्स रकमेच्या बाबतीत बँक गॅरंटी देण्यास तयार आहात. अशा परिस्थितीत गुजरात हायकोर्टाने Mithesh impex या केसमध्ये [ Civil Application No. 10804 of 2022 August 24, (2022) 144 Taxmann.com 87 (Guj)) ] संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 94(9) पान 961 मध्ये दिलेल्या निर्णयाप्रमाणे आपल्या केसमध्ये तपासणी चालू आहे म्हणून बँक गॅरंटीमध्ये फक्त कर रकमेचाही समावेश करावा लागेल त्यामध्ये व्याज आणि दंडाचा समावेश करावा लागणार नाही.
अपिलाच्या बाबतीत प्री-डिपॉझिटची रक्कम इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरद्वारे भरता येते
प्रश्न 46 : अपिलाच्या बाबतीत कलम 107 मधील तरतुदीप्रमाणे प्री-डिपॉझिटची रक्कम इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरद्वारे भरलेली आहे. संबंधित केलेला भरणा बरोबर आहे का?
उत्तर : सी.बी.आय.सी. सर्क्युलर नं. 172/04/ 2022 - जीएसटी ता. 6.7.2022 मध्ये केलेला खुलासा आणि अलाहाबाद हायकोर्टाने तुलसीराम अँड कं. [ Writ Tax No. 1237 of 2022 September 23, 2022 [ संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 94(9) पान 989 ] या केसमधील दिलेल्या निर्णयातील मुद्दे विचारात घेता अपिलाच्या बाबतीत प्री-डिपॉझिटची रक्कम इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरद्वारे भरणा करणे योग्य आहे.
मरिन पेंट ( Marine Paint ) हे जहाजाचा भाग होत नाही
प्रश्न 47 : आम्ही मरिन पेंटचे उत्पादन करतो. आमच्या समजुतीप्रमाणे त्यांचा जहाजाच्या भागामध्ये समावेश होतो आणि त्यावर जीएसटीचा दर पाच टक्के आहे. आमची ही समजूत बरोबर आहे का? आमची समजूत बरोबर नसेल तर त्यावर जीएसटीचा दर किती टक्के आहे?
उत्तर : जीएसटी कायद्याचे परिशिष्ट I मधील नोंदक्रमांक 252 (एचएसएन कोड नं. 8901) मधील मालावर जीएसटीचा दर पाच टक्के आहे. परिशिष्ट III मधील नोंदक्रमांक 52ए (एचएसएन कोड नं. 3208) मधील मालावर जीएसटीचा दर अठरा टक्के आहे. बॉम्बे हायकोर्टाने 22 डिसेंबर 2022 [ संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 96(7) पान 721 आणि 147 टॅक्समन.कॉम 212 (बॉम्बे)] रोजी जोतून इंडिया (प्रा.) लि. या केसमध्ये दिलेल्या निर्णयातील मुद्दे आणि वरील दोन्ही परिशिष्टातील नोंदींचा तपशील विचारात घेता उल्लेखित मरिन पेंटचा जहाजाच्या पार्टस्मध्ये समावेश होत नाही [...Ship can enter water and said without sail paint ] त्यावर परिशिष्टाचा दर पाच टक्के नसून परिशिष्ट III मधील नोंदक्रमांक 52ए त्यावर जीएसटीचा दर अठरा टक्के आहे.
ई-वे बिलाची मुदत संपल्यावर पुढील आठ तासात वाढविता येते
प्रश्न 48 : ई-वे बिलाची मुदत संपल्यावर पुढील आठ तासात मुदत वाढविण्याची सूचना अधिकार्याने देणे आवश्यक आहे का?
उत्तर : ई-वे बिलाची मुदत संपल्यावर ती पुढील आठ तासात वाढविता येते. या मुद्यावर कोलकता हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. [ करणसिंग वि. स्टेट ऑफ वेस्ट बंगाल रिट पिटीशन नं. 72 (2023) 31 जानेवारी 2023 [ संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 96(6) पान 596 ] या निर्णयातील महत्त्वाच्या मुद्यांप्रमाणे ई-वे बिलाची मुदत संपल्यावर जीएसटी कायद्याचे नियम 138 प्रमाणे ई-वे बिलाची मुदत संपल्यावर पुढील आठ तासात ती वाढविण्याची माहिती अधिकार्याने संबंधित व्यक्तीला देणे जरूरीचे आहे. (....Where a statue provides extention of time to a transporter the adjudicating authority before imposition of tax and penalty ought to have communicated to the transporter about his right to extend the period...).
मोटार व्हेईकल्समध्ये वापरण्यात येणार्या पीव्हीसी फ्लोअर मॅटसवर जीएसटीचा दर
प्रश्न 49 : मोटार व्हेईकल्समध्ये वापरण्यात येणार्या पीव्हीसी फ्लोअर मॅटसवर जीएसटी दराचे बाबतीत अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीचे दोन निर्णय पाहण्यात आले आहेत. ओसवाल पाली रबर्स (149 टॅक्समन.कॉम 261) या केसमध्ये हरियाणा अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने पीव्हीसी कुशन मॅट्स जी मोटार व्हेईकलमध्ये वापरली जातात त्यावर चॅप्टर 39 प्रमाणे [ संदर्भ : जीएसटी व्हॉ. 97(1) पान ए-11 ] प्रमाणे जीएसटीचा दर 18 टक्के दिला आहे आणि ऑटोटेक या केसमध्ये गुजरात अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने (ऑर्डर नं. जीयूजे/जीएएआर/2023/ 10/ता. 9.3.2023 [ संदर्भ : जीएसटी टॅक्स न्यूज 2023 सर्व्हिस नं. 17844 सीरियल नं. 14 ] निर्णय दिलेला आहे की, मोटार व्हेईकल्समध्ये वापरण्यात येणार्या पीव्हीसी फ्लोअर मॅटसवर एचएसएन कोड नं. 8708 प्रमाणे जीएसटीचा दर 28 टक्के आहे.
अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीचे उल्लेखित दोन्ही निर्णय मोटार व्हेईकल्समध्ये वापरण्यात येणार्या पीव्हीसी मॅटसच्या बाबतीत आहे, त्यावर जीएसटीचा दर 18 टक्के विचारात घ्यावयाचे की 28 टक्के विचारात घ्यावयाचे?
उत्तर : बॉम्बे हायकोर्टाने 22 डिसेंबर 2022 [ संंदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 96(7) पान 721.] 147 टॅक्समन.कॉम 212) रोजी जोतून इंडिया (प्रा.) लि. या केसमध्ये मरिन पेंटच्या बाबतीत निर्णय दिला होता की, मरिन पेंटशिवाय जहाजाचे काम होऊ शकते म्हणून त्यांचा जहाज पार्ट्समध्ये समावेश होत नाही. हा निर्णय विचारात घेता मोटार व्हेईकल्सचा पीव्हीसी फ्लोअर मॅटसचा मोटार व्हेईकल्स नोंदित समावेश होत नसून त्याचा समावेश चॅप्टर 39 मध्ये समावेश होईल. त्यावर जीएसटीचा दर 28 टक्के नसून 18 टक्के व्हायला पाहिजे. या बाबतीत महाराष्ट्र अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीकडे अर्ज करून त्याचा अधिकृत निर्णय घेणे हितावह राहील.
नमकीन बाबतीत जीएसटीचा दर
प्रश्न 50 : आम्ही सॉल्टेड आणि फ्लेवर्ड पोटॅटो चीप्स, पोटॅटो शेव, पोटॅटो साली मिक्श्चर, शिंग भुजिया इ. च्या उत्पादनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे. या मालावर जीएसटीचा दर किती टक्के आहे?
उत्तर : आपल्या उत्पादित मालाचा “नमकीन’’ सदरामध्ये समावेश होईल. जीएसटी कायद्यात नमकीनची व्याख्या दिलेली नाही, त्यामुळे व्यवसायात (Common Parlance) ते नमकीन म्हणून ओळखले जातात. त्याचा अर्थ असा की जे पदार्थ खाण्यास तयार आहेत आणि खाद्यपदार्थ, मीठ (Salt), मसाला आणि या प्रकारच्या अन्य पदार्थांपासून तयार केले जातात, त्यांना नमकीन असे समजले जाते.
जीएसटी कायद्यान्वये नमकीनच्या बाबतीत 18.7.2022 पासून जीएसटीचा दर खालीलप्रमाणे आहे :

नमकीनच्या सुट्या विक्रीवर (Which are not pre-packaged and labelled) वरील नोंदक्रमांक 101ए प्रमाणे जीएसटीचा दर पाच टक्के आहे आणि कन्टेनर (प्लास्टिक बॅग इ.) मध्ये विक्री केल्यास त्यावर वरील नोंदक्रमांक 46 प्रमाणे जीएसटीचा दर 12 टक्के आहे. (Pre-packaged and labelled)
नमकीनच्या बाबतीत गुजरात ऑथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंगने प्रजापती केवल दिनेशभाई या केसमध्ये (अॅडव्हान्स रुलिंग नं. जीयूजे/जीएएआर /आर/ 2022/54, डिसेंबर 30, 2022 संदर्भ 96 जीएसटी 779/147 टॅक्समन.कॉम 154) मध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे तपशीलवार निर्णय दिलेला आहे.