top of page

जीएसटी : कायद्यासंबंधी सल्ला [ जून २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Jun 1, 2023
  • 4 min read

ree









डिझाईन आणि आर्टवर्कसह अ‍ॅडव्हर्टायझिंग स्पेजवर जीएसटीचा दर 18 टक्के आहे

प्रश्‍न 37 : डिझाईन आणि आर्टवर्कसह अ‍ॅडव्हर्टायझिंग स्पेजच्या बाबतीत जीएसटीचा दर किती टक्के आहे? त्याचा एचएसएन कोड नं कोणता ?


उत्तर : करपात्र सेवेसंबंधी नोटिफिकेशन नं. 11 (2017) सेंट्रल टॅक्स (रेट) ता. 28.6.2017 मधील सीरियल नं. 21 (ii) मधील तपशील आणि तेलंगणा अ‍ॅपेलेट ऑथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगने टाइम एज्युकेशन कोलकता (प्रा.) लि. या केसमध्ये [ Order in Appeal No. AAAR/01/2022 May 30, 2022 संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 94(8) पान 923 ] दिलेल्या निर्णयातील मुद्दे विचारात घेता आपल्या प्रश्‍नातील अ‍ॅडव्हर्टायझिंग स्पेजचा एचएसएन कोड नं. 998361 मध्ये समावेश होतो. त्यावर जीएसटीचा दर 18% आहे.


नोंदणीदाखला रद्द करण्यासाठी काढलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये कारण देणे जरूरीचे

प्रश्‍न 38 : माझा नोंदणीदाखला रद्द करण्याच्या बाबतीत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्या कारणाने नोंदणी रद्द करण्यात येणार आहे त्याचा तपशील दिलेला नाही. अशा कारणे दाखवा नोटीसआधारे माझा नोंदणीदाखला रद्द करण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत नोंदणी रद्द करण्याची ऑर्डर बरोबर आहे का ?


उत्तर : दिल्ली हायकोर्टाने व्ही.डी.आर. कलर्स अँड केमिकल्स (प्रा.) लि. या केसमध्ये 148 टॅक्समन.कॉम 108 (दिल्ली) संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 96(4) ए-4 दिलेल्या निर्णयातील मुद्दे विचारात घेता आपल्या केसमध्ये नोंदणीदाखला रद्द करणे कायद्याला धरून नाही. (...The Honorable Highcourt noted that the impugned SCN failed to disclose any reason for proposed action of cancelling registration and was incapable of eliciting meaningful response from tax payer....)


धंद्यातील एक युनिट संपूर्णत: हस्तांतरित केल्यास त्यावर जीएसटी भरावा लागत नाही

प्रश्‍न 39 : आम्ही आपल्या धंद्यातील एक युनिट चालू स्थितीत सेट आणि लायबिलिटीसह हस्तांतरित करणार आहोत. या व्यवहारावर जीएसटी भरावा लागेल का?


उत्तर : जीएसटी कायद्याखाली करमुक्त सेवेसंबंधी नोटिफिकेशन 12(2017) सेंट्रल टॅक्स (रेट) ता. 28.6.2017 सीरियल नं. 2 मधील तरतूद (Chapter 99 Services by way of transfer of a going concern,as a whole or an independent part thereof) आणि कर्नाटका अ‍ॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने Capfront Technologies (P.)Ltd. संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 96(3) यलोपेज ए-11 मध्ये दिलेल्या निर्णयातील मुद्दे विचारात घेता [.... it would be transferred as a whole to a new owner. Thus, it would amount to transfer of a going concern and shall be exempted under GST as per Notification No. 12(2017) C.T. (Rate) dated 28.6.2017...] प्रमाणे आपल्या प्रश्‍नातील व्यवहारावर जीएसटी भरावा लागणार नाही.


करदात्याला सूचना न देता त्यांचे इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करणे कायद्याला धरून नाही

प्रश्‍न 40 : मला कोणतीही सूचना न देता माझे इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करणे बरोबर आहे का?


उत्तर : कोलकता हायकोर्टाने किनारम विनट्रेड (प्रा.) लि. या केसमध्ये [ व्हीपीए नं. 11122 (2022) ता. 30 जून 2022 संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 95(3) पान 254 ] दिलेल्या निर्णयातील मुद्दे (...Blocking the Input Tax Credit (ITC) of the Petitioner without intimating the recorded reasons for the same to the petitioner is arbitrary, illegal and in violation of principles of natural justice...) विचारात घेता आपल्या केसमध्ये आपल्याला सूचना न देता आयटीसी ब्लॉक करण्याची कार्यवाही कायद्याला धरून नाही.


इडली मिक्स (Flour) पिठावर जीएसटी दर

प्रश्‍न 41 : इडली मिक्स पिठामध्ये पिठाशिवाय थोड्या प्रमाणावर अन्नपदार्थ (Rice, Dal, Sodium Bicarbonate,Salt etc.) मिळविलेले असतात. परंतु त्यामध्ये मुख्यत: पीठच असते. आमच्या समजुतीप्रमाणे त्यावर कराची माफी आहे. आमची समजूत बरोबर आहे का?


उत्तर : आपण तयार केलेले इडली पीठ हे पीठ म्हणून वापरले जात नाही म्हणून त्यावर तामिळनाडू अ‍ॅपेलेट ऑथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगने कृष्णा भुवन फूडस अँड स्वीटस या केसमध्ये [ अपील नं. एएएआर/02, 2022 ता. 13 जानेवारी 2022 संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 96(3) पान 326 ] मध्ये दिलेल्या निर्णयातील मुद्दे आणि परिशिष्ट III मधील नोंदक्रमांक 23 (एचएसएन 2106) मधील तपशील विचारात घेता, आपण तयार केलेल्या इडली पीठावर जीएसटीचा दर 18 टक्के आहे.

इन्स्टंट मिक्सेसच्या बाबतीत गुजरात अ‍ॅपेलेट ऑथॉरिटीने दिपककुमार या केसमध्ये खालीलप्रमाणे निर्णय दिलेला आहे. ...has held that the "Instant Mixes" are classifiable under CTH 2106 and are coverd under SI. No. 23 of SCh.III... and are Leviable to.GST @ 18% [ संंदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 96(4) पान 359 ]


ई-वे बिलामध्ये व्हेईकल्सचा टाईप लिहिण्या-मध्ये चूक असल्यास दंड लागत नाही

प्रश्‍न 42 : आम्ही जीएसटी पोर्टलवर ई-वे बिल जनरेट केलेले आहे. माल ट्रकद्वारे पाठविला आहे, त्यामध्ये ट्रकचा नंबर बरोबर लिहिलेला आहे. फक्त व्हेईकलचा टाईप (प्रकार) लिहिण्याच्या बाबतीत चूक झालेली आहे. सदर चुकीमुळे कलम 129(1) खाली दंड लागू शकतो का?


उत्तर : गुजरात हायकोर्टाने Dhabring Poly Word Ltd. या केसमध्ये [ R/Special Civil Application No. 7702 of 2022, April 27, 2022 (संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 95(6) पान 599) दिलेल्या निर्णयातील मुद्दे आणि सर्क्युलर नं. CBEC/20/16.3.2017 GST dated 14.9.2018 पॅरा 5 मधील मुद्दे विचारात घेता तसेच आपल्या प्रश्‍नातील मुद्दा विचारात घेता कलम 129(1) प्रमाणे दंड लावणे योग्य नाही. सर्क्युलरमधील पॅरा 5 मध्ये दिलेल्या खुलासाप्रमाणे कलम 125 ला अनुसरून 1,000 रुपये दंड होऊ शकेल. [ Penalty to the tune of Rs.500 each under section 125 of the CGST Act and the respective state GST Act should be imposed Rs. 1,000,]


व्यवसायकर बोनस/ग्रॅच्युईटीवर लागू नाही

प्रश्‍न 43 : मी नोकराला दिवाळी बोनस किंवा रिटायरमेंटसाठी ग्रॅच्युईटी देणार आहे. त्यावर व्यवसायकर कापावा की नाही?


उत्तर : व्यवसायकर कायदा कलम 2(एच) अनुसार कामगाराला नियमितपणे मिळणारा पगार किंवा मजुरी, मग ती रोखीने किंवा वस्तूंच्या (Kind) रूपाने दिलेली असो, यामध्ये महागाई भत्ता आणि अन्य प्रकारच्या मेहनताना शिवाय आयकर कायदा 1961 कलम 17 मध्ये दिलेले रूपांतर भत्ते (परक्विझिटस) आणि वेतनाऐवजी नफ्याचा भाग यांचाही समावेश होतो. परंतु यामध्ये बोनस, ग्रॅच्युईटीचा समावेश होत नाही.

त्यामुळे आपण नोकराला दिवाळी बोनस किंवा रिटायरमेंटसाठी ग्रॅच्युईटी देत असाल तर त्यावर व्यवसायकर दायित्व येणार नाही.

 
 
bottom of page