जीएसटी : कायद्यासंबंधी सल्ला [ मे २०२३ ]
- Vyapari Mitra
- Apr 29, 2023
- 3 min read

जीएसटीआर-3बी उशिराने दाखल केल्यास व्याज भरावे लागते
प्रश्न 30 : आम्ही पत्रकासाठी ठराविक मुदतीत देयकर इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरवरून डिपॉझिट केलेले आहे. परंतु काही जरूरीचे कारणांमुळे जीएसटीआर-3बी ठराविक मुदतीत दाखल केला नाही. अशा परिस्थितीत या बाबतीत आम्हाला व्याज भरावे लागेल का?
उत्तर : झारखंड हायकोर्टाने आरसीबी ट्रान्समिशन (इंडिया) लि. (2022) संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 94(6) ए-10 या केसमध्ये दिलेल्या निर्णयातील मुद्दे विचारात घेता, पत्रकातील देयकर ठराविक मुदतीत इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरद्वारे भरला तरी जीएसटीआर-3बी उशिराने दाखल केला म्हणून त्याप्रमाणे देयकरावर व्याजही भरावे लागेल.
मासिक लायसेन्स फीवर जीएसटी भरावा लागत नाही
प्रश्न 31 : मला बसस्टँडच्या टॉयलेट देखभालीचे काम मिळालेले आहे. या कामाच्या बाबतीत मला ठराविक लायसेन्स फी द्यावी लागते. सदर लायसेन्स फी वर जीएसटी भरावा लागेल का?
उत्तर : जीएसटी कायद्याखाली करमुक्त सेवेच्या बाबतीत काढलेल्या नोटिफिकेशन 12 (2017) सेंट्रल टॅक्स (रेट) ता. 28.6.2017 मधील सीरियल नं. 76 प्रमाणे “Services by way of public convenience. Such as Provision of facilities of bathroom, washrooms, lavatories, urinal or toilets’’ या कामाच्या बाबतीत दिलेल्या लायसेन्स फी वर जीएसटी भरावे लागत नाही. या मुद्यावर आंध्रप्रदेश हायकोर्टाने राजीव युवायोजना संघम या केसमध्ये (संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 94(7) पान 728) वर उल्लेख केल्याप्रमाणे निर्णय दिलेला आहे.
(Where works contract for maintenance, of toilets at bus station was awarded to Petitioner and Petitioner paid monthly licence fee for same to respondent, such fee was exempt from tax)
चुकीच्या अधिकार्याकडे अपील केल्यास, त्यांनी त्याबाबतीत करदात्याला सूचना देणे जरूरीचे
प्रश्न 32 : अपील स्टेट अॅपेलेट ऑथॉरिटीकडे न करता सेंट्रल अॅपेलेट ऑथॉरिटीकडे केले गेले. अपील स्टेट अॅपेलेट ऑथॉरिटीकडे करणे जरूरीचे होते. याबाबतीत सेंट्रल अॅपेलेट ऑथॉरिटीने आम्हाला सूचना दिली नाही. स्टेट अॅपेलेट ऑथॉरिटीकडे अपील करण्यासाठी उशीर झालेला आहे. सदर उशीर झालेली मुदत माफ होईल का?
उत्तर : हायकोर्ट त्रिपुरा यांनी ट्रॉपीकल बिव्हरिजेज (प्रा.) लि. [संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 95(5) पान 449] या केसमध्ये दिलेल्या निर्णयातील मुद्दे विचारात घेता चुकीच्या अॅपेलेट अधिकार्याकडे अपील केले गेले म्हणून त्याबाबतीत नवीन अपील करताना झालेला उशीर माफ व्हायला पाहिजे. (Since the matter has been filed before a wrong forum, the delay in filling the appeal shall be condoned)
इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करण्यासाठी संबंधिताला नोटीस देणे जरूरीचे आहे
प्रश्न 33 : आम्हाला सूचना न देता इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करण्यात आलेले आहे. ही कार्यवाही बरोबर आहे का?
उत्तर : जीएसटी कायद्याचे कलम 74(5) ची तरतूद आणि मद्रास हायकोर्टाने अमुधा मेटल इंडस्ट्रीज या केसमध्ये [ संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 94(9) पान 957 ] दिलेल्या निर्णयातील मुद्दे विचारात घेता, वरील कलमाखाली नोटीस न देता इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करणे बरोबर नाही.
करदात्याच्या विरुद्ध निर्णय घेताना त्यांना त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देणे जरूरीचे
प्रश्न 34 : आमचे म्हणणे मांडण्याची संधी न देताच आमच्या केसमध्ये कर आणि दंड लावण्यात आलेला आहे. खात्याची ही कार्यवाही योग्य आहे का?
उत्तर : जीएसटी कायद्याचे कलम 75(4) मधील तरतूद (..... or where any adverse decesion is contemplated ageinst such person.) आणि गुजरात हायकोर्टाने Graziano Transmissioni India (P). Ltd. या केसमध्ये [ संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 94(7) पान 691 ] दिलेल्या निर्णयातील मुद्दे विचारात घेता करदात्याविरुद्ध कर किंवा दंड लावण्याच्या अगोदर त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देणे जरूरीचे आहे.[ ... Where any adverse decesion is contemplated against such person section 75(4) ]
नोंदणी रद्द करण्याच्या बाबतीत धंद्याच्या जागेच्या तपासणीसाठी नोंदित व्यक्तीला हजर राहण्यासाठी नोटीस देणे जरूरीचे आहे
प्रश्न 35 : आम्हाला नोटीस न देता धंद्याच्या जागेची तपासणी करून नोंदणी रद्द करण्यात आली. याप्रकारे नोंदणी रद्द करणे बरोबर आहे का?
उत्तर : दिल्ली हायकोर्टाने बिमल कोठारी या केसमध्ये [ संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 94(7) ए-9 ] दिलेल्या निर्णयातील मुद्दे विचारात घेता धंद्याच्या जागेच्या तपासणीच्या बाबतीत हजर राहण्यासाठी मालकाला नोटीस न देता नोंदणीदाखला रद्द केला असेल तर ते बरोबर नाही.
बिल्डिंगच्या रिपेअरसाठी भांडवली स्वरूपाच्या खरेदी केलेल्या मालाच्या बाबतीत इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही
प्रश्न 35 : बिल्डिंगच्या रिपेअरसाठी खरेदी केलेल्या टाईल्स, ग्रॅनाईट, एसीपी शीट्स, स्टील प्लेटस इ. माल भांडवली स्वरूपाची खरेदी म्हणून धरलेला आहे, या मालाच्या खरेदीवर भरलेल्या जीएसटीचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल का?
उत्तर : जीएसटी कायद्याचे कलम 17(5)(सी) मधील शब्दरचना आणि मध्यप्रदेश अॅपेलेट ऑथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंगने Jabalpur Entertainmant Complexes (P.) Ltd. या केसमध्ये [ संदर्भ : जीएसटी केसेस व्हॉ. 94(8) पान 912 ] दिलेल्या निर्णयातील मुद्दे विचारात घेता आपल्या प्रश्नातील खरेदी केलेला माल जो भांडवली स्वरूपाची खरेदी म्हणून धरलेला आहे, त्यांचे बाबतीत इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. [ .... Repair of building is ineligible to the extent of capitalization in terms of clause (C) of section 17(5) of GST Act.2017 ]