जीएसटी/व्यवसायकर नोटिफिकेशन्स [ मे २०२३ ]
- Vyapari Mitra
- Apr 28, 2023
- 4 min read
1. विलंब शुल्क माफीसंबंधी
नोटि. 8 (2023) सीटी ता. 31.3.2023 अन्वये कलम 128 च्या अधिकाराखाली नोंदित व्यक्तीने फॉर्म जीएसटीआर-10 मध्ये अंतिम रिटर्न भरलेले नाही परंतु त्यांनी संबंधित रिटर्न 1 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत भरल्यास कलम 47 अन्वये विलंब शुल्क 1,000 रुपयांपर्यंत मर्यादित राहील म्हणजेच त्यावरील अतिरिक्त विलंब शुल्काची माफी राहील.
2. नोटि. 27 (2022) मधील नोंदणीत सुधारणा
नोटि. 5 (2023) सीटी ता. 31.3.2023 अन्वये नियम 8 (4ए) ची तरतूद (आधार अधिप्रमाण स्वीकारणे न स्वीकारणेसंबंधी) गुजरात राज्य वगळता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू होणार नाही संबंधी काढलेल्या नोटि. 27 (2022) ता. 26.11.2022 च्या नोटि. मधील वाक्य Provisons of ऐवजी Proviso To असा शब्द बदल ता. 31.3.2023 च्या नोटि. नुसार करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अन्य बदल नाही.
3. रिटर्न न भरण्याच्या बाबतीत अॅसेसमेंट ऑर्डर मागे घेण्याबाबत प्रक्रिया पालन
नोटि. 6 (2023) सीटी ता. 31.3.2023 अन्वये सीजीएसटी कायद्याच्या कलम 148 च्या अधिकाराखाली नोंदित व्यक्ती ज्यांनी अॅसेसमेंट ऑर्डर 28 फेब्रुवारी 2023 ला किंवा त्यापूर्वी जारी केलेल्या तारखेनंतर पुढील 30 दिवसात कलम 62(1) (रिटर्न न भरण्याच्या बाबतीत आकारणी) खाली वैध रिटर्न दाखल केले नसेल अशा नोंदित व्यक्तींच्या वर्गाने खाली नमूद केल्याप्रमाणे विशेष प्रक्रियेचे पालन केले तर संबंधित अॅसेसमेंट ऑर्डर मागे घेण्यात आली आहे असे मानले जाईल.
नोंदित व्यक्तीनी असे रिटर्न 30 जून 2023 ला किंवा त्यापूर्वी दाखल करावे.
संबंधित रिटर्न विहित करासह आणि कलम 50(1) खालील व्याज आणि कलम 47 खालील विलंब शुल्कासह भरलेले असावे.
अशा आदेशाविरुद्ध कलम 107 प्रमाणे अपील दाखल केले आहे किंवा नाही किंवा केले असल्यास त्यावर निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा नाही.
4. वाढीव मुदतीबाबत
नोटि. 9 (2023) सीटी ता. 31.3.2023 अन्वये विशिष्ट तारखा वाढविण्याबाबतचा कलम 168ए च्या अधिकाराखाली (आयजीएसटी कलम 20 आणि युटीजीएसटी कलम 21 ला अनुसरून) जीएसटी कौन्सिलच्या शिफारशी अन्वये कलम 73(10) अन्वये वाढीव मुदत आणि कलम 73(9) अन्वये न भरलेल्या किंवा कमी भरलेल्या कराच्या वसुलीसाठी किंवा चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या कर क्रेडिटच्या वसुलीसाठी किंवा वापरलेल्या क्रेडिट बाबतीत खालील नमूद वर्षासाठीची वाढीव मुदत खालीलप्रमाणे राहील.:
आर्थिक वर्ष 2017-18 साठी 31 डिसेंबर 2023
आर्थिक वर्ष 2018-19 साठी 31 मार्च 2024
आर्थिक वर्ष 2019-20 साठी 30 जून 2024
विलंब शुुल्क माफीसंबंधी
[ नोटि. 7 (2023) सीटी ता. 31.3.2023 ]
सीजीएसटी कलम 44 अन्वये विहित मुदतीत वार्षिक पत्रक न भरणार्या खालील टेबलमधील नमूद वर्गासाठी टेबलमधील नमूद अतिरिक्त विलंब शुल्काची आर्थिक वर्ष 2022-23 पासून माफी मिळेल.

तथापि ज्या नोंदित व्यक्ती 2017-18 ते 2020-21 किंवा 2021-2022 या कोणत्याही आर्थिक वर्षासाठी या कायद्याच्या कलम 44 अन्वये पत्रके भरण्यास अयशस्वी झाल्या आहेत, परंतु उल्लेखित आर्थिक वर्षाचे पत्रक 1 एप्रिल 2023 ते 30.6.2023 या कालावधीत विहित देयकर आणि विलंब शुल्कासह भरल्यास कलम 47 अन्वये रुपये वीस हजार (सीजीएसटी दहा हजार + एसजीएसटी दहा हजार) विलंब शुल्काची माफी मिळेल.
नोंदणीदाखला पुनर्जीवनासाठी राबवायची प्रक्रिया
[ नोटि. 3 (2023) सीटी ता. 31.3.202३ ]
कलम 148 च्या अधिकाराखाली आणि जीएसटी कौन्सिलच्या शिफारशी अनुसार नोंदित व्यक्ती ज्याचा नोंदणीदाखला कलम 29(2)(बी) किंवा (सी) अन्वये 31 डिसेंबर 2022 ला किंवा त्यापूर्वी रद्द झालेला आहे, याबाबतीत त्याने रिव्होकेशन (पुनर्जीवनासाठी) ऑफ कॅन्सलेशनसाठी कलम 30 मधील विहित मुदतीत अर्जही केलेला नाही, याबाबतीत त्यांनी खालील प्रक्रिया अवलंबवावी :
नोंदित व्यक्तीने संबंधित नोंदणी दाखल्याच्या पुनर्जीवनासाठी 30 जून 2023 पर्यंत अर्ज करावा.
अर्ज विहित देय मुदतीत भरलेली पत्रके ही कर, व्याज, दंड आणि विलंब शुल्कासह भरून नोंदणी रद्दच्या विहित अर्जाच्या तारखेसह सादर करावा.
अशाप्रकारे केलेल्या अर्जाला मुदतवाढ मिळणार नाही.
स्पष्टीकरण : या नोटि. च्या उद्देशान्वये व्यक्ती कलम 30 मधील नमूद कालावधीत नोंदणी पुनर्जीवनासाठी अयशस्वी झालेल्या व्यक्तीमध्ये नोंदणी रद्द करण्याच्या आदेशाविरुद्ध किंवा तो फेटाळण्याच्या आदेशाविरुद्ध अपील करणार्या व्यक्तीचाही समावेश होतो. तसेच कलम 107 अन्वये नोंदणी रद्द करण्याचा अर्ज या कायद्याच्या कलम 30(1) मधील निर्देशित कालमर्यादेचे पालन न केल्यामुळे नाकारला जाऊ शकतो.
फॉर्म जीएसटीआर-4 (कॉम्पोझिशन) साठी विलंबशुल्क माफी
[ नोटि. 2 (2023) सीटी ता. 31.3.202३ ]
ता. 31.3.2023 च्या नोटि. अन्वये जुलै 2017 ते मार्च 2019 या तिमाही कालावधीचा किंवा आर्थिक वर्ष 2019-20 ते 2021-22 या कालावधीचा फॉर्म जीएसटीआर-4 हा 1 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत विहित देयकर आणि विलंब शुल्कासह भरल्यास कलम 47 अन्वये रुपये 500 (सीजीएसटी रु. 250 आणि एसजीएसटी रु. 250) प्रतिवर्ष प्रमाणे विलंब शुल्काची आणि निरंक (NIL) पत्रकाबाबत संपूर्ण विलंबशुल्काची माफी मिळेल.
व्यवसायकर : (1) अपंगत्वाबाबत कलम 27ए मधील सुधारणा
(2) परिशिष्ट ख नोंद क्र. (ii) महिलांच्या व्यवसायकर दायित्वाबाबत
[ एल.ए. बिल नं. XIII (2023) दि. 20.3.2023 ] (महाराष्ट्र अधिनियम क्र. 19)
व्यवसायकर कायद्याखालील माफीसंबंधी कलम 27ए आहे. यातील उपकलम (सी) हे अपंगत्वाबाबतीत आहे. या उपकलमाऐवजी नवीन उपकलमाची 1 एप्रिल 2023 पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे ती पुढीलप्रमाणे :
(1) कलम 27ए (सी)
राईट ऑफ पर्सन्स विथ डिसअॅबिलिटी अॅक्ट 2016 च्या कलम 2(आर) मध्ये नमूद केलेली कोणतीही व्यक्ती किंवा,
लक्षणीय दिव्यांगत्वासह (बेंचमार्क डिसअॅबिलिटी) असणार्या बालकाचे पालक आणि गार्डियन्स
तथापि, अशी व्यक्ती किंवा बालक ज्याला संबंधित लक्षणीय दिव्यांगाबाबतचे सर्टिफिकेट या कायदे किंवा नियमाखाली जारी करण्यात आले आहे.
तसेच त्याने किंवा नियोक्त्याने संबंधित सर्टिफिकेट विहित अधिकाराखालील अखत्यारीत या क्लॉज अन्वये प्रथम निर्धारणा वर्षात असे सर्टिफिकेट प्रस्तुत केलेले आहे.
उल्लेखित बाबींची पूर्तता त्याने 1 एप्रिल 2023 पूर्वी केलेली असल्यास त्यास वरील सर्टिफिकेट सादर करायची आवश्यकता नाही.
बेंचमार्क डिसअॅबिलिटी म्हणजे (बेंचमार्क अपंग असलेली व्यक्ती) एखादे निर्दिष्ट अपंगत्व चाळीस टक्केपेक्षा कमी नसलेली व्यक्ती, जिथे निर्दिष्ट अपंगत्व मोजमाप करण्यायोग्य अटींमध्ये व्याख्या केली गेली नाही आणि त्यामध्ये प्रमाणित प्राधिकरणाने प्रमाणित केल्याप्रमाणे निर्दिष्ट अपंगत्व मोजमाप करण्यायोग्य अटीमध्ये परिभाषेत केलेले आहे अशा व्यक्तीचा समावेश होतो.
(2) क्लॉज (ई) जो मंदबुद्धीच्या व्यक्तीला व्यवसायकर माफीसंबंधी आहे तो आणि,
(3) क्लॉज (जी) जो शारीरिक अपंगत्वाने पीडित असलेल्या मुलाच्या आई-वडील किंवा पालकाशी संबंधित आहे.
कलम 27ए (सी) मध्ये बदल केल्या कारणाने वरील दोन्ही क्लॉज 1 एप्रिल 2023 पासून रद्द करण्यात आले आहेत.
व्यवसायकर कायद्याच्या परिशिष्ट ख मधील नोंद क्र. 1 (ii) (महिलांना वार्षिक भराव्या लागणार्या व्यवसायकरासंबंधी) ची शब्दरचना पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे
परिशिष्ट I नोंद क्र. १(ii)
