दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा तुम्ही भोगायची!!!श्री. मनोज भिडे [ जून २०२३ ]
- Vyapari Mitra
- May 31, 2023
- 2 min read

श्री. मनोज भिडे, दापोली.
98225 45217
tinfcdapoli@gmail.com
जीएसटी कायदा आल्यावर जुन्या कायद्यातील त्रुटी दूर होतील व नवीन कायदा सहज व सुलभ होईल अशी अपेक्षा होती.
परंतु स्टेटवाईज वेगवेगळा असणारा कायदा आता सर्व देशासाठी एक झाला आणि प्रॉब्लेम सॉल्व न होता ते अनेक झाले.
आणि त्यातला कायम स्वरूपी कधीही न संपणारा प्रॉब्लेम जीएसटीचा सेटऑफ!!!
आता खालील उदाहरण पहा :

म्हणजेच वरील फरकाप्रमाणे जीएसटी भरला की आपलं काम झालं. दिसायला सोप्प आहे ना? पण प्रत्यक्ष असे घडत नाही.
आम्हाला कधी-कधी खरेदीवरील सेटऑफ मिळतच नाही ! आणि आपल्याला विक्रीवरील
रु. 21.600 पूर्ण जीएसटी भरावा लागतो. का?
ज्या व्यापार्याकडून माल घेतला, त्याने जीएसटी भरलाच नाही.
जीएसटी भरला, पण जीएसटी रिटर्न दाखल केलेच नाही.
रिटर्न दाखल केले, पण ड्यू डेटनंतर भरले.
रिटर्न भरले, पण आता.... आपल्या जीएसटी नंबरवर त्याची विक्री दाखवलीच नाही.
जीएसटी नंबरवर विक्री दाखवली, पण आता त्या वर्षीचा जीएसटी क्लेम करण्याची मुदतच संपली. अशा काही त्रुटी विक्रेत्या व्यापार्याकडून झाल्या आणि त्यामुळे आपला मात्र सेटऑफ गेला.
आता यात ज्या व्यापार्याने माल खरेदी केला त्याची चूक काय? पण केवळ विक्रेत्या व्यापार्याकडून झालेल्या त्रुटीचा भूर्दंड खरेदी करणार्या व्यापार्याने सोसायचा, असाच नियम !
मान्य आहे की, सर्वांना आर्थिक शिस्त लागली पाहिजे. प्रत्येकाने वेळेवरच आपले टॅक्स, रिटर्न्स भरली पाहिजेत. पण कधी-कधी अनवधानाने काही त्रुटी, चूका होऊ शकतात व काही कारणाने कम्प्लायन्स करण्यात विलंब होऊ शकतो.
माणूस आहे, चुकणार...विलंब होणार...काही मेडिकल, वैयक्तिक, आपत्कालीन... अन्य काही कारणे असू शकतात ना... पण... त्याची शिक्षा ज्याची काहीही चूक नाही त्याने भोगायची!!!
बरं, यावर अगदी ढोबळ उत्तर दिले जाते. आत्ता भरा.. पुढच्या महिन्यात मिळेल सेऑफ.. व्वा! छानच!
ठीक आहे.. रक्कम छोटी असेल तरी आपण दुर्लक्ष करतो आणि तात्पुरती जीएसटी रक्कम अदा करतो. पण हीच रक्कम काही लाख रुपये असेल तर? कशी भरणार?
आपला व्यवसाय बँक सीसीवर चालू असतो. आपला पैसा हा व्यापारी देणी, स्टॉक, उधारी येणे बाकी यात अडकलेला असतो आणि त्यात अजून भर म्हणून दुसर्याने न भरलेला जीएसटी आपण भरायचा! का?
यात जरा सुद्धा रिलॅक्सेशन नाही का देऊ शकत? दरमहा कम्प्लायन्स करण्याच्या कट टू कट ठरवलेल्या तारखा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न सर्व जण करीत असतातच..
पण कधी तरी लेट होऊ शकतो ना... पण एक दिवस जरी उशीर झाला तरी लगेच त्या महिन्याचा सेटऑफच रद्द!! थोडी तरी मुदत द्याल की नाही.. आणि आता याची दाद मागायची कुणाकडे?
डिपार्टमेंट! जीएसटी पोर्टलवर दिसेपर्यंत तुम्हाला सेटऑफ मिळणार नाही.. सीए! सेटऑफ न मिळालेल्या व्यापार्यांची भली मोठी यादी देऊन मोकळा होतो. आणि व्यापारी! आता हा जीएसटी कुणी भरायचा.. यावरून एकमेकांशी भांडत बसतात.. अशा गोष्टींमुळेच व्यापारी त्रस्त होतो आणि व्यवसाय नको.. पण जीएसटी आवर... अशी त्याची गत होते.
त्यामुळे यावर सारासार विचार होऊन जीएसटी स्टेटऑफबाबत थोडी शिथिलता देणे अत्यंत आवश्यक आहे याचा विचार व्हावा !