महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 ठळक वैशिष्ट्ये [ एप्रिल २०२३ ]
- Vyapari Mitra
- Apr 8, 2023
- 2 min read

अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प - शाश्वत शेती - समृद्ध शेतकरी सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती, पर्यावरणपूरक विकास या पाच ध्येयांवर आधारित ‘पंचामृत.’
बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ (केंद्र सरकारकडून 6,000 आणि राज्य सरकारकडून 6,000)
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकर्याचा विमा हप्ता राज्य सरकार भरणार. शेतकर्यांना केवळ एक रुपया भरून नोंदणी
गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह योजना अन्वये अपघातग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबास 2 लाख रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान.
सोलापूर येथे ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्राची’ स्थापना
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची व शिवभोजन थाळीची सोय.
‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना’ आणि ‘गोमय मूल्यवर्धन योजना’ योजनांची अंमलबजावणी.
महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना - मुख्यालय अहमदनगर.
विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्यांना अन्नधान्याऐवजी प्रतिवर्ष, प्रतिव्यक्ती 1800 रुपये रोख रक्कम.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयांची सुधारित प्रशासनीय मान्यता.
मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या सततच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय ‘वॉटर ग्रीड’ निर्माण करणार.
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन.
मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार
कोकणात काजू बोंड प्रक्रिया केंद्रे.
प्रधानमंत्री कुसूम योजनेतून 1.50 लाख सौर कृषि पंप.
प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद.
श्रीक्षेत्र रिद्धपूर जि. अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार.
‘लेक लाडकी’ : पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर इयत्ता पहिली, सहावी, अकरावीच्या टप्प्यावर 4 ते 8 हजार रुपये अनुदान - 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये रोख रक्कम देणार.
महिलांना एस.टी बस तिकीटात 50% सवलत.
नोकरदार महिलांसाठी 50 वसतिगृहे.
पिडीत महिलांच्या आश्रयासाठी विधी सेवा, आरोग्य सेवा, समुपदेशन यासाठी नवीन शक्तीसदन योजनेत 50 केंद्रे स्थापणार.
आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या मानधनात प्रत्येकी 1,500 एवढी वाढ करणार.
अंगणवाडी सेविकांचे मानधन 10 हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 7,200 रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 5,500 रुपये करणार.
महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करणार.
महाराष्ट्र राज्य ऑटोरिक्षा, टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार.
केंद्र शासनाच्या रिड्युस, रियूज व रिसायकल या तत्त्वावर आधारित नागपूर, मुंबई महानगर प्रदेश, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक व रत्नागिरी या सहा ठिकाणी सर्क्युलर इकॉनॉमी पार्क करणार.
नवी मुंबई येथे भव्य जेम्स व ज्वेलरी पार्क उभारणार.
अप्रत्यक्ष तरतुदी संबंधी ठळक वैशिष्ट्ये
महिलांना व्यवसाय करात सवलत : मासिक 25 हजार रुपये वेतन असलेल्या महिलांना कोणताही व्यवसाय कर भरावा लागणार नाही.
दिव्यांग व्यक्तींना व्यवसायकरात सवलत : व्यवसायकर अधिनियमान्वये “दिव्यांग व्यक्तीची’’ व्याख्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार सुधारित करण्याचे प्रस्तावित.
विमान चालन चक्की इंधनावरील (ATF) मूल्यर्धित करात सवलत
हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि रायगड जिल्हा या भौगोलिक क्षेत्रात विमान चालन चक्की इंधनावरील (ATF) मूल्यवर्धित कराचा दर 25 टक्के वरून 18 टक्के करण्याचे प्रस्तावित.
राज्यकर विभागाची अभय योजना
वस्तू व सेवाकर कायदा लागू होण्यापूर्वी राज्यकर विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विविध कायद्यांच्या संदर्भात ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड योजना 2023 अभय योजना. या योजनेचा कालावधी 1 मे 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 असेल. दिनांक 1 मे 2023 रोजी प्रलंबित असलेल्या थकबाकीसाठी ही योजना लागू राहील.
वैधानिक आदेशानुसार कोणत्याही वर्षासाठी व्यापार्याची थकबाकी रुपये दोन लाखापर्यंत असल्यास सदर रक्कम त्या वर्षासाठी पूर्णपणे माफ करण्याचे प्रस्तावित आहे.
कोणत्याही वैधानिक आदेशानुसार व्यापाऱ्याची थकबाकी रुपये पन्नास लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा प्रकरणात एकूण थकबाकीच्या 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 80 टक्के रकमेस माफी देण्यात येईल.