व्यापारी बंधूंनी घ्यावयाची दक्षता [ जुलै २०२३ ]
- Vyapari Mitra
- Jul 28, 2023
- 2 min read
व्यापारी बंधूंनी घ्यावयाची दक्षता

(1) जुलै महिन्यात आयकरासंबंधी करावयाची कामे
दिनांकपर्यंत कामाचा तपशील
7 जुलै
जून 2023 मध्ये मुळातून करकपात (टीडीएस) व मुळातून करवसुली (टीसीएस) केलेली रक्कम भरण्याची शेवटची तारीख. चलन नं. आयटीएनएस - 281 मध्ये.
एप्रिल ते जून 2023 या तिमाहीची मुळातून करकपात (टीडीएस) रक्कम भरण्याची शेवटची तारीख. (कलम 192, 194ए, 194डी किंवा 194एच खाली टीडीएस रक्कम तिमाही भरण्याची आकारणी अधिकार्यांनी परवानगी दिली असल्यास.)
15 जुलै
जून 2023 ला संपणार्या तिमाहीचे टी.सी.एस. पत्रक फॉर्म 27 ईक्यू मध्ये दाखल करावे.
जून 2023 ला संपणार्या तिमाहीमध्ये मिळालेले फॉर्म 15जी/15एच मधील घोषणापत्र दाखल करावे.
मे 2023 मध्ये कलम 194आयए प्रमाणेस्थावर मालमत्ता खरेदी करताना मुळातून करकपात केलेल्या रकमेचे टीडीएस सर्टिफिकेट फॉर्म नं. 16 बी मध्ये देण्याची शेवटची तारीख.
मे 2023 मध्ये कलम 194आयबी प्रमाणेव्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबाने भाडे देताना मुळातून करकपात केलेल्या रकमेचे टीडीएस सर्टिफिकेट फॉर्म नं. 16सी मध्ये देण्याची शेवटची तारीख.
मे 2023 मध्ये कलम 194एम प्रमाणे व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबाने ठेकेदाराला किंवा व्यावसायिकाला रक्कम देताना मुळातून करकपात केलेल्या रकमेचे सर्टिफिकेट टीडीएस सर्टिफिकेट फॉर्म नं. 16डी मध्ये देण्याची शेवटची तारीख.
कामगार कायदे
जून 2023 या महिन्याचा प्रॉव्हिडंड फंड भरण्याची शेवटची तारीख.
जून 2023 या महिन्याचा ई.एस.आय. भरण्याची शेवटची तारीख.
30 जुलै
जून 2023 मध्ये कलम 194आयए प्रमाणे स्थावर मालमत्ता खरेदी करताना मुळातून करकपात केलेल्या कराचे चलन-कम-स्टेटमेंट फॉर्म नं. 26क्यूबी मध्ये दाखल करण्याची शेवटची तारीख.
जून 2023 मध्ये कलम 194आयबी प्रमाणेव्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबाने भाडे देताना मुळातून करकपात केलेल्या कराचे चलन-कम-स्टेटमेंट फॉर्म नं. 26 क्यूसी मध्ये दाखल करण्याची शेवटची तारीख.
जून 2023 मध्ये कलम 194एम प्रमाणे व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबाने ठेकेदाराला किंवा व्यावसायिकाला रक्कम देताना मुळातून करकपात केलेल्या कराचे चलन -कम-स्टेटमेंट फॉर्म नं. 26 क्यूडी मध्ये दाखल करण्याची शेवटची तारीख.
जून 2023 ला संपणार्या तिमाहीचे टी.सी.एस. सर्टिफिकेट फॉर्म नं. 27डी मध्ये द्यावे.
31 जुलै
आकारणी वर्ष 2023-24 साठी आयकर पत्रक दाखल करावे. [ कंपनी किंवा ज्यांचे आयकर कायद्याखाली किंवा इतर कायद्याखाली ऑडिट होते किंवा ऑडिट होणार्या भागीदारीचे कार्यकारी भागीदार सोडून ]
जून 2023 ला संपणार्या तिमाहीसाठी पगारातून करकपातीचे (टी.डी.एस.) पत्रक फॉर्म 24क्यू आणि व्याज, भाडे, व्यावसायिक फी, कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट, कमिशन किंवा ब्रोकरेज इत्यादीमधून करकपातीचे पत्रक फॉर्म 26क्यू मध्ये दाखल करण्याची तारीख.
2. जुलै महिन्यात जीएसटी/व्यवसायकरासंबंधी करावयाची कामे
दिनांक पर्यंत कामाचा तपशील
फॉर्म जीएसटीआर-1 [ जून २०२३ साठी ]
11 जुलै 1) उलाढाल 5 कोटीच्या वर असल्यास किंवा मासिक पत्रक भरण्याचा पर्याय स्वीकारल्यास.
13 जुलै 1) मागील दोन महिन्यात आणि चालू महिन्यातील न दाखविलेली सर्व बिले तिमाही पत्रकात दाखल करा.
18 जुलै 1) कॉम्पोझिशन स्कीमखाली पहिल्या तिमाहीचा सीएमपी-08 दाखला करा.
फॉर्म जीएसटीआर-3बी [ जून २०२३ साठी ]
20 जुलै 1) मागील आर्थिक वर्षातील उलाढाल 5 कोटीच्या वर असल्यास.
22 जुलै 1) मागील आर्थिक वर्षातील उलाढाल 5 कोटीच्या आत असल्यास.
2) तिमाही पत्रक भरण्याचा पर्याय स्वीकारल्यास.