top of page

व्यापारी बंधूंनी घ्यावयाची दक्षता [ जून २०२३ ]

  • Vyapari Mitra
  • Jun 1, 2023
  • 2 min read

ree

व्यापारी बंधूंनी

घ्यावयाची

दक्षता





(1) जून महिन्यात आयकरासंबंधी करावयाची कामे

दिनांकपर्यंत कामाचा तपशील

7 जून

मे 2023 मध्ये मुळातून कर कपात (टी.डी.एस.) आणि मुळातून कर वसुली (टी.सी.एस.) केलेली रक्कम भरण्याची शेवटची तारीख, चलन नं. आयटीएसएस-281 मध्ये


14 जून
  1. एप्रिल 2023 मध्ये कलम 194 आयए प्रमाणे स्थावर मालमत्ता खरेदी करताना मुळातून कर कपात केलेल्या रकमेचे टी.डी.एस. सर्टिफिकेट फॉर्म नं. 16बी मध्ये देण्याची शेवटची तारीख.

  2. एप्रिल 2023 मध्ये कलम 194आयबी प्रमाणे व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबाने भाडे देताना मुळातून कर कपात केलेल्या रकमेचे टी.डी.एस. सर्टिफिकेट फॉर्म नं. 16सी मध्ये देण्याची शेवटची तारीख.

  3. एप्रिल 2023 मध्ये कलम 194एम प्रमाणे व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबाने ठेकेदाराला किंवा व्यावसायिकाला रक्कम देताना मुळातून कर कपात केलेल्या रकमेचे टी.डी.एस. सर्टिफिकेट फॉर्म नं. 16डी मध्ये देण्याची शेवटची तारीख.

15 जून

  1. सर्व करदात्यांनी (कलम 44एडी आणि कलम 44एडीए खाली पात्र करदाते सोडून) आकारणी वर्ष 2024-2025 साठी भरावयाच्या आगाऊ आयकराचा (15 टक्के) पहिला हप्ता भरण्याची शेवटची तारीख.

  2. मार्च 2023 ला संपणार्‍या तिमाहीचे टी.डी.एस. सर्टिफिकेट फॉर्म नं. 16ए मध्ये देण्याची शेवटची तारीख.

  3. पगाराचे वर्ष 2022-23 चे वार्षिक टी.डी.एस. सर्टिफिकेट फॉर्म नं. 16 मध्ये देण्याची शेवटची तारीख.

कामगार कायदे

15 जून
  1. मे 2023 या महिन्याचा प्रॉव्हिडंट फंड भरण्याची शेवटची तारीख.

  2. मे 2023 या महिन्यात ई.एस.आय. भरण्याची शेवटची तारीख.

30 जून
  1. मे 2023 मध्ये कलम 194 आयए प्रमाणे स्थावर मालमत्ता खरेदी करताना मुळातून कर कपात केलेल्या कराचे चलन-कम-स्टेटमेंट फॉर्म नं. 26 क्यूबी मध्ये दाखल करण्याची शेवटची तारीख.

  2. मे 2023 मध्ये कलम 194 आयबी प्रमाणे व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबाने भाडे देताना मुळातून कर कपात केलेल्या कराचे चलन-कम-स्टेटमेंट फॉर्म नं. 26 क्यूसी मध्ये दाखल करण्याची शेवटची तारीख.

  3. मे 2023 मध्ये कलम 194एम प्रमाणे व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबाने ठेकेदाराला किंवा व्यावसायिकाला रक्कम देताना मुळातून करकपात केलेल्या कराचे चलन कम स्टेटमेंट फॉर्म नंबर 26 क्यूडी मध्ये दाखल करण्याची शेवटची तारीख.

  4. पॅन-आधार जोडण्यासाठी शेवटची तारीख.


2. जून महिन्यात जीएसटीसंबंधी करावयाची कामे

दिनांक पर्यंत कामाचा तपशील

फॉर्म जीएसटीआर-1 [ मे 2023 साठी ]

11 जून 1) उलाढाल 5 कोटीच्या वर असल्यास किंवा तिमाही पत्रक भरण्याचा पर्याय न स्वीकारल्यास.

13 जून 1) 50 लाखापर्यंतची सर्व बिले बीटूबी दाखल करावीत.


फॉर्म जीएसटीआर-3बी [ मे 2023 साठी ]

20 जून 1) मागील आर्थिक वर्षातील उलाढाल 5 कोटीच्या वर असल्यास.

22 जून 1) मागील आर्थिक वर्षातील उलाढाल 5 कोटीच्या आत असल्यास.

2) तिमाही पत्रक भरण्याचा पर्याय न स्वीकारल्यास

25 जून 1) तिमाही पत्रक भरण्याचा पर्याय स्वीकारल्यास. (जीएसटी पेमेंटसाठी)

29 जून 2023-24 साठी कॉम्पोझिशन पर्याय निवडल्यानंतर 31.3.2023 पर्यंतचा शिल्लक मालाचा तपशील

30 जून 1) 2022-23 ची करदेयता 1 लाखापेक्षा जास्त असल्यास व्यवसायकराचे जून चे मासिक पत्रक भरा.


30 जून जीएसटी नोटिफिकेशन 2, 3, 6, 7 आणि 8 ता. 31 मार्च 2023 अनुसार खालील कामाची पूर्तता करा.
  1. विलंब शुल्क माफीबाबत डिलरने 1 जुलै 2017 पासून 31 मार्च 2022 पर्यंत जीएसटीआर-4 (कम्पोझिशन डिलर) न भरल्यास भरा. (नोटि. 2)

  2. 31 डिसेंबर 2022 किंवा त्यापूर्वी जीएसटी रिटर्न न भरल्यामुळे नोंदणी रद्द झालेली व्यक्ती रिटर्न भरून नोंदणी पुनर्जीवित करता येईल. (नोटि. 3)

  3. 28 फेब्रुवारी 2023 ला किंवा त्यापूर्वी रिटर्न न भरल्यामुळे लागू अ‍ॅसेसमेंट ऑर्डरप्रमाणे रिटर्न भरल्यास मागे घेण्यात येईल. (नोटि. 6)

  4. विलंब शुुल्क सवलतीबाबत 1 जुलै 2017 पासून 31 मार्च 2022 पर्यंत वार्षिक पत्रक न भरल्यास भरा. (नोटि. 7)

  5. नोंदणी रद्द केल्यावर शेवटचे पत्रक जीएसटीआर-10 न भरल्यास भरा. (नोटि. 8)

नोट : वरील शीर्षकाअन्वये उल्लेखित सर्व नोटिफिकेशनची विस्तृत माहिती व्यापारी मित्र मे-2023 पान 41 ते 43 वर नमूद आहे.

 
 
bottom of page